Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War: युक्रेनच्या शहरांवर 500 रशियन ड्रोनचा वर्षाव; 90 मिनिटांत शहरांचे मोठे नुकसान, 9 ठार

Russia Ukraine War : रशियाने 500 हून अधिक ड्रोन वापरून युक्रेनवर मोठा हल्ला केला, ज्यात नऊ नागरिक ठार झाले आणि निवासी क्षेत्रे, किराणा दुकाने व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 13, 2026 | 11:49 AM
russia launches 500 drones attack on ukraine

russia launches 500 drones attack on ukraine

Follow Us
Follow Us:
  • ५०० हून अधिक ड्रोनचा वापर
  • नागरी भागांवर भीषण हल्ले
  • आर्थिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) चार वर्षांनंतरही थंडावण्याचे नाव घेत नाही आहे. उलटपक्षी, रशियाने आपल्या आक्रमकतेची तीव्रता आणखी वाढवली आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक प्रमुख प्रदेशांवर एकाच वेळी अभूतपूर्व असा हवाई हल्ला चढवला. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या ९० मिनिटांच्या कालावधीत युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करत तब्बल ५०० हून अधिक ड्रोन डागण्यात आले. या भीषण हल्ल्यात कमीत कमी ९ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक निवासी इमारती, व्यावसायिक दुकाने आणि देशाच्या पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या भीषण आक्रमणावर सोशल मीडियाद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, रशियाने एकाच दिवसात युक्रेनवर ५०० हून अधिक ‘शाहेद’ आणि इतर लढाऊ ड्रोन डागले आहेत. युद्धभूमीवर थेट यश मिळत नसल्याने आता रशियन सैन्य नागरी वस्त्या आणि युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य करत आहे. युक्रेनियन नागरिक ज्या तळांच्या आणि सुविधांच्या आधारे युद्धाच्या काळात तग धरून आहेत, ते सर्व आर्थिक केंद्र नष्ट करणे हाच रशियाचा एकमेव कुटिल डाव असल्याचा गंभीर आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत

सामान्यांच्या वाहनांवर आणि दुकानांवर थेट हल्ले

आघाडीचे प्रमुख शहर असलेल्या क्रामटॉर्स्कच्या नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने लष्करी तळांऐवजी थेट सामान्य नागरिकांना आपले शिकार बनवले आहे. क्रामटॉर्स्क शहरात अवघ्या ९० मिनिटांच्या अंतराने तीन वेगवेगळ्या ठिकाणी नागरी वाहनांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. यात रस्त्यावरून जाणाऱ्या तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. स्थानिक प्रशासनाने संताप व्यक्त करत सांगितले की, रशिया आता युद्धभूमी सोडुन दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या गाड्यांवर थेट हल्ले करत आहे.

Usmanov and Fridman are exactly the kind of Russian business figures who need to find the courage to take concrete steps against the war. This is exactly the kind of Russian economy that should not be given additional opportunities while the Ukrainian economy is suffering from… pic.twitter.com/uagcNm8Abe — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) September 12, 2026

credit – social media and Twitter

दुसरीकडे, झिटोमिर प्रदेशातील झ्वियाहेल शहरात एका भरगच्च किराणा दुकानावर रशियन ड्रोनने थेट हल्ला केला. या भीषण स्फोटात दुकानातील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय परिसरातील दोन पेट्रोल पंप आणि एका परदेशी गुंतवणुकीच्या व्यावसायिक इमारतीवरही ड्रोन आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

झापोरिझिया, ओडेसा आणि क्रिव्हि रिहमध्ये आगीचे तांडव

झापोरिझिया प्रदेशाचे गव्हर्नर इव्हान फेडोरोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यात २ नागरिक ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे मूळ गाव असलेल्या ‘क्रिव्हि रिह’ या शहरालाही रशियाने रात्रीच्या वेळी निशाणा बनवले. क्रिव्हि रिहवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साह्याने एकाच वेळी मारा करण्यात आला, ज्यात २ जणांचा मृत्यू झाला.

काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ओडेसा या महत्त्वपूर्ण बंदर शहरावरही शनिवारी रात्रीपासून सलग हल्ले सुरूच होते. ओडेसाचे गव्हर्नर ओलेह किपर यांनी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये निवासी उंच इमारतींचे वरचे मजले पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून तब्बल ४० नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

डोनेत्स्क आणि मोल्दोव्हा सीमेवर ताणतणाव

युक्रेनियन हल्ल्यांचा दावा करत रशियन नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व डोनेत्स्क भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात ३ जण मारले गेल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. या युद्धाची झळ आता शेजारील देशांनाही बसू लागली आहे. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन ड्रोनचा धोका निर्माण झाल्यानंतर मोल्दोव्हा या देशाने सुरक्षेचा उपाय म्हणून आपली संपूर्ण हवाई हद्द आणि ७ प्रमुख सीमा तपासणी नाके (Border Checkpoints) सुमारे एका तासासाठी पूर्णपणे बंद केले होते. एकंदरीत, रशियाच्या या भीषण ५०० ड्रोनच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे.

Web Title: Russia ukraine war russia launches 500 drones attack on ukraine cities 9 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Russia Ukraine War Update
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

Russia-Ukraine War : मियामीत पुतिनला भेटायला झेलेन्स्की तयार! G20 मध्ये थेट चर्चेची तयारी
2

Russia-Ukraine War : मियामीत पुतिनला भेटायला झेलेन्स्की तयार! G20 मध्ये थेट चर्चेची तयारी

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
3

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
4

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.