Russia-Ukriane War Russian missile strike on Ukraine's Sumy leaves 21 dead, 83 injured
कीव: युक्रेनवर पुन्हा एकदा रशियाने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यांत 21 हून अधिक लोक ठार झाले असून 83 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सुमी शहरावर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची माहिती देत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगाला रशियाविरुद्ध जोरदार प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूक्रेनचे स्थानिक रहिवासी पाम संडे साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. यादरम्यान रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला.
“पाम संडेच्या निमित्ताने लोक एकत्र जमले होते, परंतु रशियामुळे आमच्या लोकांना एका भयानक दुर्घटनेचा सामना करावा लागत. दुर्दैवाने या हल्ल्यात 21 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.” अशी माहिती सुमी शहराचे महापौर आर्टेम कोबझार यांनी माध्यमांना दिली.
युक्रेनच्या आपत्कालीन सेवेन दिलेल्या माहितीनुसार, पाम संडे साजरा करण्यासाठी शेकडो लोक जमले होते, यादरम्यान रशियाने सुमी शहराच्या मध्यभागी बॅलेस्टिक क्षेफणास्त्रांचा मारा केला. यामध्ये सात लहान मुलांसह 83 लोक जखमी झाले आहेत. सध्या या भयानक घटनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळता आहे. यामध्ये जखमींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जळत्या गाड्या आणि रस्त्यावर पडलेला गाडीचे तुकडे, झाड्यांच्या पडलेल्या फाद्यां, कॉंक्रीटचे तुकडे दिसून येत आहेत. सध्या बचाव कार्य सुरु आहे.
रशियाच्या या हल्ल्यांला विरोध करत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी, युक्रेनमधील सुमी शहराच्या मध्यभागी दोन रशियन क्षेपणास्त्रे कोसळली, यामुळे पुन्हा एकदा मुलांसह असंख्य नागरिकांचे बळी गेले. तसेच सर्वांना माहिती आहे, हे युद्ध एकट्या रशियाने सुरू केले होते आणि आज, हे स्पष्ट आहे की रशियाला हे युद्ध सुरूच ठेवायचे आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायदा आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या राजनैतिक प्रयत्नांकडे उघड दुर्लक्ष करत आहेत. युद्धबंदीसाठी त्वरित आणि कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे.
This morning, two Russian missiles struck the heart of the city of Sumy in Ukraine, causing numerous civilian casualties, including children once again.
Everyone knows: this war was initiated by Russia alone. And today, it is clear that Russia alone chooses to continue it…
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) April 13, 2025
हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन्ही देशांशी संवाद साधून शांततेच्या मार्गाने युद्धबंदीसाठी प्रयत्न करत आहेत. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, रशियाच्या या हल्ल्यावर ट्रम्प यांची भूमिका काय असले.