Russia wants to take control of Europe Putin's plan shook the world
मॉस्को: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. संपूर्ण जगाची अपेक्षा हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. संपूर्म जगाची अपेक्षा हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देखील वाटाघाटी करण्यास तयारी दर्शवली आहे. नाटो देश तसेच युरोपियन युनियने देखील यासाठी प्रयत्न करत आहे.
दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपसाठी मोठा धोका निर्माण झाला असून रशियाला केवळ युक्रेन नव्हे तर संपूर्ण युरोपवर ताबा मिलवायचा आहे. 2029 पर्यंत रशिया युरोपवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे युरोपच्या दाराशी मोठे संकट उभे असल्याचे जर्मनच्या एका लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
जर्मन आर्मीचे महानिरीक्षक कार्स्टेन ब्रॉअर यांनी इशारा दिला आहे की, 2029 पर्यंत रशिया नाटो देशांवर मोठ्या प्रमामात हल्ले करु शकतो. यासाटी रशियाने तयारी देखील सुरुकेली आहे. ब्रॉअर यांनी दावा केला आहे की, येत्या काही काळात रशियन सैन्याची ताकद 30 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हा आकडा युद्धग्रस्त युक्रेनला नव्हे तर मोठ्या युरोपीय लष्कराला पराभव करण्यासाठी आहे. असे संकेट ब्रॉअर यांनी दिले आहेत. ब्रॉअर यांनी इशारा दिला आहे की, पुतिन राजैनितक मार्गाने नाटो युती कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या रशिया लष्करात भरती करत असून गेल्या आठवड्यात 1.60 लाख तरुणांना जबरदस्तीने सैन्यात सामील करण्यात आले आहे. 2011 नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यामुळे भविष्यात आणखी मोठे युद्ध भडकण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. याचा सर्वात मोठा धोका युरोपसाठी मानला जात आहे.
रशिया मानवी संसाधने, लष्करी साहित्यात मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे. दरवर्षी सुमारे 1500 हून अधिक लष्करी टॅंक बांधले जात आहेत. तसेच जुने ताकदवर टॅंक देखील सुसज्ज केले जात आहेत. रशिया शस्त्रास्त्रांचा साठा दुप्पटीने वाढवत आहेत. यामुळे या सर्व संकेतांवरुन लक्षात येते की क्रेमलिन केवळ युक्रेनपर्यंतच मर्यादित न राहता युरोपवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
ब्रॉअर यांचा हा इशारा लक्षात घेऊन युरोपनेही स्वत:च्या संरक्षणाची तयारीला वेग दिला आहे. जर्मनीने लिथुआनियामध्ये 5 हजार सैनिक तैनात करण्याची घोषणा केली आहे. तसेच फ्रान्स देखील नागरिकांसाठी मार्गदर्शन पुस्तक प्रकाशित करत आहे. यामध्ये युद्ध काळात टिकून कसे रहावे याबद्द काही टिप्स देण्यात आल्या आहेत. तसेच राखीव दलात सैन्य सामील करण्यात येत आहे, आपात्कालीन किट देखील तयार करुन ठेवले जात आहे.
तसेच काही देशांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बाल्टिक देश लाटविया, लिथुआनिया आणि क्रोएशिया रशियाजवळच्या सीमांवर सुरक्षा क्षेत्र उभारणार आहेत. यामध्ये 600 बंकर, अँटी-टँक ट्रेंच, फॉरेस्ट बॅरियर्स, ड्रॅगन टूथ आणि रॉकेट सिस्टीम असणार आहे.
तसेच पोलंड आणि बाल्टिक देशांनी माववविरोधी खाणींचे कर आंतरराष्ट्रीय करापासून वेगळे ठेवले आहेत. यामुळे भविष्यात रशियन सैन्याला रोखण्यासाठी शस्त्र पुरवठा कमी पडणार नाही. युरोपमधील अनेक देश सक्तीच्या लष्करी भरतीच्या धोरणावर लक्ष केंद्रित करत आहेत. ब्रिटनने याची सुरुवातही केली आहे.रशियाची आक्रमक रणनीती पाहता, युरोपला लवकरात लवकर स्वत:च्या संरक्षण क्षेत्रात वाढ करण्याची गरज आहे.