Mehul Choksi: मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी; तपास यंत्रणांनी आखली योजना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: देशाच्या एका शत्रुचे म्हणजेच दहशतवादी तव्वहुर राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले असून त्याच्यावर न्यायलयीन कारवाई सुरु आहे. दरम्यान आता भारताच्या दुसऱ्या फरार शत्रूला अटक करण्यात आली असून लवकरच त्याचेही प्रत्यार्पण भारतात करण्यात येणार आहे.भारताची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय तपास यंत्राणा CBI च्या विनंतीवरुन अटक करण्यात आली आहे. यामुळे भारतीय नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे की, देशाचे इतर शत्रू दहशतवादी आणि फरार देशद्रोही देखील लवकरच पकडले जातील.
भारत सरकारने दहशतवाही आणि फरारा देशद्रोही लोकांच्या प्रत्यार्पणासाठी सतत प्रयत्न करत आला असून या प्रयत्नांचे फळ मिळताना दिसत आहे. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विविध देशांकडून अशा 178 दहशतवादी आणि देशद्रोहींच्या प्रत्यार्पणाच्या विनंत्या केल्या होत्या. यापैकी 23 जणांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
मेहुल चोक्स हा एक हिरे व्यापरी आहे. गीतांजली ग्रुपचा मालक असून याचे 4 हजारांहून अधिक स्टोअर आहेत. चोक्सीने आपला पुतण्या नीर मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँक मध्ये मोठा घोटाळा केला. दोघांवर बँकेची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने दोघांना फरार घोषित केले होते. सध्या चोक्सीच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे. मात्र, पुतण्या नीरव मोदीचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.
दरम्यान मुंबई न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसवर मेहुल चोक्सीने त्याला रक्त कर्करोग असून रेडिएशन थेरपीमुळे तो भारतात येऊ शकत नाही असे म्हटले होते. त्यावेळेपासून तपास यंत्रणा चोक्सीला अटक करण्याचा प्रयत्नात होत्या. ED ने त्याच्या परदेशी मालमत्तेवर नजर ठेवली होती. त्यानुसार थायलंड, जपान आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये मालमत्ता विकून भारतात हस्तांतरण करण्यास सांगितले. यामुळे पीडितांना पैसै परत मिळतील असे ED ने म्हटले.
चोक्सीला 2017 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाले आणि नंतर त्याने 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर भारतातून पळ काढला. त्यानंतर PNB ने चोक्सीविरोधात 15 हजारो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरु केली. 2018 मध्ये इटरपोलने चोक्सीविरोधात रेड कॉर्नर म्हणून नोटी जारी केली होती. 2021 मध्ये अँटिग्वातून मेहूल चोक्सी फरार झाला आणि डेमिनिकामध्ये स्थायिक झाला. नंतर 2025 मध्ये तो बेल्जियममध्ये असल्याचे माहिती मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून तो बेल्जियममध्ये पत्नी प्रीतीसोबत वास्तव करत होता.त्याची पत्नी बेल्जियमची नागरिक असून त्याला सहज नागरिक्तव मिळाले होते. दरम्यान भारतीय तपास यंत्रणांनी बेल्जियम सरकारडे त्याच्या अटकेची विनंती केली. सध्या चोक्सी आजारी असल्याचे कारण सांगून जामीन मिळवण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत त्याला देशात परत आणणे भारत सरकारसाठी कठीण होत आहे. यामुळे तपास यंत्रणा चोक्सीच्या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी बेल्जियमला जाण्याची तयारी करत आहेत. मेहुल चोक्सी कोठडीत राहावा आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू व्हावी यासाठी कायदेशीर रणनीती तयार केली जात आहे.