बिजिंग: अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. अमेरिकेने चीनवर 145% परस्पर कर लागू केला आहे. चीनने कर रद्द करण्याची विनंती देखील केली आहे. परंतु ट्रम्प यांनी चीनवरील निर्बंध हटवण्यास नकार दिला आहे. दरम्यान चीनने देखील ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. या टॅरिफ युद्धाचा फटका आता विमानवाहतूक क्षेत्रावर देखील होण्याची शक्यता आहे. कारण चीनने अमेरिकेच्या बोईंग विमान कपन्यांना मोठा झटका दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने देशातील कंपन्यांना अमेरिकन बोइंग जेट विमानांची डिलिव्हरी न घेण्याचे आदेश दिले आहे. अमेरिकेतून एअरक्राफ्ट होणारी उपकरणे आणि इतर पार्ट्स खरेदी न करण्याचे निर्देश या कंपन्यांना देण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेला मोठा झटका मिळाला आहे.
ट्रम्प यांनी चीन उत्पादनांवरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. चीनमधून येणाऱ्या उत्पादनांवर 145% कर लादले आहे. याच्या प्रत्युत्तराच चीनने देखील अमेरिकन आयातींवर 125% शुल्क लागू केले आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर आता बोइंन विमाने अमेरिकेकडून घेण्यास नकार दिला आहे. चीनचा हा निर्णय अमेरिकेच्या विमानवाहतूक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चीन अशा कंपन्यांना आर्थिक मदत करण्याच्या विचार आहे, ज्या कंपन्या अमेरिकेडून बोइंग जेट भाड्याने घेतात. मात्र यावर अद्याप चीनकडून किंवा संबंधित चीनच्या एअरलाइन्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
एव्हिएशन कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, सद्या 10 बोइंग 737 मॅक्स विमाने चीनी एअरलाइन्सच्या ताफ्यात सामील होणार आहेत. यामध्ये चायना सदर्न एअरलाइन्स, एअर चायना लिमिटेड आणि जियामेन एअरलाइन्सच्या प्रत्येकी दोन विमानांचा समावेश आहे. काही विमाने सिएटल येथील बोइंगच्या फॅक्टरी जवळ तर काही झोउशान (पूर्व चीन) येथील फिनिशिंग सेंटरमध्ये उभी आहेत. ज्यांची कागदपत्रे व पेमेंट आधीच झाले आहेत, त्यांना केस-बाय-केस मंजुरी मिळू शकते.
चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एव्हिएशन बाजार असून, पुढील 20 वर्षांत जागतिक एअरक्राफ्ट डिमांडमध्ये 20% हिस्सा चीनकडून अपेक्षित आहे. चीन सध्या युरोपियन एअरबसकडे अधिक झुकत आहे आणि स्थानिक पातळीवर तयार होणारी COMAC C919 विमानं बोइंगला पर्याय ठरत आहेत. बोइंगसाठी ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे, कारण 2024 मध्ये त्यांच्या क्वालिटीवरही अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.