Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण

Putin India Visit Date : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा टॅरिफवॉर दरम्यान भारत आणि रशिया संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 30, 2025 | 11:49 AM
Russian President Vladimir Putin to visit India in December

Russian President Vladimir Putin to visit India in December

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार
  • टॅरिफवॉर दरम्यान पुतिन यांचा दौरा महत्वपूर्ण
  • यापूर्वी चीनमध्ये SCO परिषदेत घेणार मोदींची भेट
Vladimir Putin India Visit : मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. रशियाच्या अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने शुक्रवारी (२९ ऑगस्ट) याची पुष्टी केली. २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine War) पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा असणार आहे. हा दौरा अशा वेळी निश्चित करण्यात आला आहे जेव्हा भारत रशियाची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होते, तर दुसरीकडे अमेरिकेकडून भातावर रशियाकडून तेल व्यापार थांबवण्यावर दबाव वाढत आहे.

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनमध्ये होणाऱ्या शांघाय शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पुतिन यांची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्या भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा केली जाईल. तसेच अमेरिकेच्या भारतावरील वाढत्या दबावावरही चर्चा होईल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे 50% टॅरिफ लादले आहेत. भारत रशियाला युक्रेनविरुद्ध अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. २७ ऑगस्टपासून कराची अंमलबजावणी झाली आहे.

PM मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख निश्चित; जाणून घ्या कधी होणार बैठक?

२०२१ मध्ये पुतिन यांचा शेवटचा दौरा

यापूर्वी पुतिन २०२१ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी भारताला भेट दिली होती. केवळ ४ तासांसाठी भारतात आले होते. यावेळी भारत आणि रशियामझ्ये २८ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये २०२५ पर्यंत ३० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.

यामुळे यावेळी दोन्ही देशांमध्ये नवीन आर्थिक धोरणे निश्चित होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारत आणि रशियामध्ये १०० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापार करार करण्यात आला आहे.

अजित डोवाल यांचा रशिया दौरा

तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला मॉस्कोला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुतिन यांची भेट घेतली. दरम्यान दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, आर्थिक आणि उर्जा सहकार्यावार द्विपक्षीय चर्चेसाठी बैठक झाली.

भारत आणि रशियाचे संबंध सोव्हिएत काळापासून आहेत. यामुळे दोन्ही देशांनी आतापर्यंत धोरणात्मक भागीदारीला अत्यंत महत्व दिले आहे. यामुळे पुतिन यांची डिसेंबरमध्ये होणारी भेटही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. आता लवकरच तारीखही निश्चित केली जाईल.

जमिनीवर कोसळताच आगीच्या गोळ्यात रुपांतिरत झाले विमान; अमेरिकेच्या F-35 फायटर जेटचा अपघात, Video Viral

Web Title: Russian president vladimir putin to visit india in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India Russia relations
  • narendra modi
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर.. 
1

Russia-India Trade: आता रुपया-रुबलमध्ये होणार व्यवसाय! रशिया म्हणतो, अनेक देशांसोबत डॉलर.. 

US Travel Ban : 30 हून अधिक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास घालण्यात येणार बंदी; लवकरच Donald Trump जाहीर करणार यादी
2

US Travel Ban : 30 हून अधिक देशांना अमेरिकेत प्रवेश करण्यास घालण्यात येणार बंदी; लवकरच Donald Trump जाहीर करणार यादी

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द
3

ट्रम्पचा बायडेनवर हल्ला! माजी राष्ट्राध्यक्षांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा दावा करत ऑटोपेन आदेश केले रद्द

‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले
4

‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.