रशियाचा युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर; 11 जणांचा मृत्यू 84 जखमी
कीव: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर रशियाविरूद्ध युक्रेन युद्ध लवकरच थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रशिया युक्रेन युद्धाला 2020 मध्ये सुरूवात झाली असून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही हे युद्ध अजूनही सुरूच आहे. दरम्यान रशियाने युक्रेनवर आणखी एक मोठ हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या उत्तरी भागांत सुमी शहरावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असूनअनेक जण जखमी झाल्याती माहिती मिळाली आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सहा लहान मुलांचा देखील समावेश आहे. युक्रेन-रशिया युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले असून युक्रेनआणि रशिया युद्धाला आज एक हजार वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान याच वेळी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अमेरिकेने लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी युक्रेनला दिली
दरम्यान आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यातची क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रशिया-युक्रेन संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
युक्रेन-रशिया युद्धादरम्यान उत्तर कोरियाने रशियाला हजारो सैनिक मदतीसाठी पाठवले आहेत. उत्तर कोरियाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे या पाठिंब्याचे प्रत्युत्तर म्हणून युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांचे पुतिन यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आवाहन
दुसरीकडे जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांनी फोन करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फोनवर चर्चा केली. त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आवाहन केले. सुमारे दोन वर्षानंतर ओलाफ स्कॉल्झ आणि पुतिन यांच्यामध्ये संवाद झाला. तासभर चाललेल्या या संवादारम्यान स्कोल्झ यांनी रसियाला युक्रेनमधून सैन्य माघारी घेण्यास सांगितले. आणि युक्रेनला जर्मनची सतत समर्थनाची पुष्टी केली.