फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तेहरान: इराणच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे अली खामेनेई यांनी त्यांच्या मुलाची मोजतबाची निवड उत्तराधिकारी म्हणून केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय स्वत: खामेनेई यांनी गुप्त बैठक घेऊन घेतला असल्याचे म्हटले जात आहे. अली खामेनेई यांची प्रकृती खालविल्याने हा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इराणने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
अली खामेनेई यांनी स्वत: बैठक घेतली
अली खामेनेई यांनी खुद्द एक बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेताना त्यांच्यावर दबाव आला होता. खामेनेई आणि त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीतील सदस्यांच्या एकमताने निर्णय घ्यायला हवा अशी धमक्याही त्यांना मिळाल्या होत्या. मिळेलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनेई यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र ते फक्त महत्त्वाच्या बैठकींमध्ये दिसतात असे इराणच्या काही प्रमुखे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जनतेचा विरोध टाळण्यासाठी निर्णय गुप्त ठेवण्यात आला
मीडिया रिपोर्टनुसार, 2009 मध्ये निवडणुकीनंतर इराणमध्ये आंदोलनाला आळा घालण्यााठी मोजतबा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांंना 2021 मध्ये अयातुल्ला ही पदवी देण्यात आली. असे म्हटले जाते की, ही पदवी इराणच्या सर्वोच्च नेता होण्यासाठी राज्यघटनेत अट आहे. यामुळे जनतेचा विरध टाळण्यासाठी हा निर्णय गुप्त ठेवला असल्याचे सांगितले जात आहे.
इराणच्या विधानसभेचे मत
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या विधानसभेने हा निर्णय गुप्त ठेवला असून यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, त्यांना व्यापक आणि सार्वजनिक निदर्शनाची भीती होती. यामुळे इराणच्या सरकारला जनतेकडून विरोध होण्याची शक्यता असेल. याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. असेही इराणच्या विधानसभेने इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर चर्चा
अली कामेनेईंच्या मते त्यांनी जजर त्यांच्या मुलांकडे सत्ता सोपवली तर ते हयात असेपर्यंत सुरळीत हस्तांतरण होईल. यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध टाळता येईल. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये अली खामेनेईंची प्रकृती खराब असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अली खामेनेईंची प्रकृती सध्या गंभीर आहे. याबाबत अनेक अहवाल देखील समोर आले असल्याचे म्हटले जात आहे.