Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाच्या आण्विक हल्ल्यांच्या धोरणांत बदल; क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरासाठी वापरणार आण्विक शस्त्रे

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. दरम्यान आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2024 | 06:25 PM
रशियाच्या आण्विक हल्ल्यांच्या धोरणांत बदल; क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरासाठी वापरणार आण्विक शस्त्रे

रशियाच्या आण्विक हल्ल्यांच्या धोरणांत बदल; क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरासाठी वापरणार आण्विक शस्त्रे

Follow Us
Close
Follow Us:

मास्को: रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. गेल्या दीड वर्षापासून हे युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यावर कोणते पाऊल उचलतील असा तेढ निर्माण झाला होता. दरम्यान अध्यक्ष पुतिन यांनी याविरोधात एक मोठी निर्णय घेतला आहे. त्यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापराशी संबंधित धोरणांमध्ये हा महत्त्वपूर्णबदल केला आहे. या बदलेल्या नियमांनुसार, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहकार्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला कर रशिया देखील अणवस्त्राचा पार करणार असल्याचे ठरले आहे. अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची बायडेन यांच्यावर टिका; म्हणाले, “रशिया-युक्रेन युद्ध…”

रशिया-युक्रेन युद्धाला हजार दिवस पूर्ण

रशिया-युक्रेन युद्धाला हजार दिवस पूर्ण झाल्यानंतर पुतिन यांनी या नवीन धोरणांवर स्वाक्षरी केली. या धोरणात स्पष्ट करण्याता आले आहे की, रशियावर अणुशक्ती क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास तर रशिया अण्वस्त्रांचा वापर प्रत्युत्तरात करू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) वापरण्यास मान्यता दिली आहे. ही सिस्टम 300 किमीपर्यंत अचूक हल्ला करू शकते.

जो बायडेन यांच्या क्षेपणास्त्रांच्या निर्णयामुळे रशिया-युक्रेन तणावात वाढ

अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रांची मदत पुरवल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये अमेरिकेने युक्रेनला ATACMS क्षेपणास्त्रे पुरवली होती, परंतु ती केवळ युक्रेनच्या आत वापरण्याची अट होती. आता ही अट काढून टाकण्यात आली असून युक्रेनला अधिक आक्रमक होण्यास परवानगी मिळाली आहे.

याशिवाय, फ्रान्सने देखील युक्रेनला स्टॉर्म शॅडो नावाची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली होती. मात्र तीही मर्यादित वापरासाठी होती. या बदलांमुळे रशियाने आपले अणु धोरण कडक केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याची भिती निर्माण झाली आहे.

नाटोला पुतिन यांचा इशारा

पुतिन यांनी म्हटले की, अमेरिकेच्या उपग्रह आणि तांत्रिक सहाय्याशिवाय युक्रेन या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करू शकत नाही. तसेच नाटोचे प्रशिक्षित जवानच ही शस्त्रे प्रभावीपणे हाताळू शकतात. त्यामुळे, नाटो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या युद्धात सामील होत आहे. यामुळे पुतिन यांनी नाटोला इशारा दिला आहे की, नाटोचे सदस्य युक्रेनच्या बाजून सहभागी झाले तर रशिया कठोर पावले उचलेले. अशा परिस्थितीत तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून जागतिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची बायडेन यांची परवानगी; काय असेल पुतिन यांचे पुढचे पाऊल?

Web Title: Russias nuclear strike policies nuclear weapons to be used in response to lon range missiles nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:25 PM

Topics:  

  • America
  • britain
  • Joe Biden
  • Russia
  • ukraine

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी
3

America Shutdown : अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले
4

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.