Russia's President Putin Proposal for peace talks directly presented to Ukraine
मॉस्को: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासमोर थेट शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. पुतिन यांचे बदलते सुरु पाहून अनेकांना धक्का बसला आहे. ईस्टरच्या एक दिवस आधी देखील त्यांनी 30 तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. तसेच पुतिन यांनी म्हटले आहे की, ते युद्धविरामासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून गेल्या आठवड्यापासून रशियावर सुरु असलेल्या युद्धबंदीचा दबाब हे कारण पुतिन यांच्या निर्णयामागे असल्याचे म्हटले जात आहे.
युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही पुष्टी केली आहे की, कीव अमेरिका आणि इतर पाश्चत्य देशांना भेटण्यासाठी एक शिष्ट मंडळ लंडनाला पाठवत आहे. ही बैठक गेल्या आठवड्यात पॅरिमध्ये झालेल्या बैठकीचा पाठपुरावा असणार आहे. गेल्या आठवड्यात अमेरिका आणि युरोपीय देशांनी तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला विराम देण्यावर चर्चा केली होती.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ईस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर 30 तासांच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. परंतु ही बंदी उठताच पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
दरम्यान पुतिन यांनी युक्रेनसमोर थेट शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे जागतिक स्तरावर तीन वर्षांहून अधिका काळ सुरु असलेले युद्ध थांबेल अशी आशा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. अमेरिकेने देखील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. पुतिन यांनी म्हटले आहे की, मॉस्को शांतता चर्चेसाठी तयार असून कीवकडूनही हीच अपेक्षा ठेवत आहे.याच दरम्यान वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी 30 दिवसांच्या युद्धबंदीची मागणी केली आहे.
दरम्यान या आठवड्यात लंडनमध्ये रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी एक बैठक होणार आहे. आता तीन वर्षाहून अधिका काळ सुरु असलेले युद्ध थांबते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, या आठवड्यात अमेरिका शांंततेसाठी अंंतिम प्रस्ताव सादर करणार आहे. हा शांतता करार न झाल्यास अमेरिका शांतता प्रयत्नांमधून माघार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपेल की तणावात आणखी वाढ होईल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत विमान अपघातांची मालिका सुरुच ; ऑर्लँडोत डेल्टा विमानाला आग