PM Modi Saudi Arab Visit: पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात पोहोचले; जेद्दाहमध्ये करण्यात आले भव्य स्वागत, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रियाध: पंतप्रधान मोदी सध्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणानवरुन पंतप्रधान मोदी मंगळवारी (22 एप्रिल) जेद्दाहला पोहोचले आहेत. या ठिकाणी पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तिसरा अरेबियन दैरा आहे. भारत आणि सौदी अरेबियाच्या ऐतिहासिक संबंधांचे केंद्र असलेल्या जेद्दाहला पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.
या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी भारत आणि सौदी अरेबिया सहा सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी करणार आहेत. तसचे काही इतर महत्वपूर्ण करारांना अंतिम स्वरुप देण्यासाठी चर्चा देखील करणार आहेत. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्म बिन सलमान अल सौद यांच्या भेट घेतील या भेटीदरम्याम हज यात्रेशी संबंधि मुद्द्यांवर, विशेष करुन भारतीय यात्रेकरुंच्या कोट्यावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधानांचे विमान सौदीच्या हवाई हद्दीत पोहोचताच, त्यांना रॉयल एअर फोर्सच्या F-15 लढाऊ विमानांनी एस्कॉर्ट केले. हे भव्य स्वागत भारत आणि सौदी अरेबियामधील वाढत्या संबंधांचे प्रतीक मानले जात आहे. जेद्दाहमध्ये पंतप्रधानाचे भव्य राजकीय सन्मानाने स्वागत करण्यात आले.
#WATCH | In a special gesture, fighter planes from Saudi Arabia escort Prime Minister Narendra Modi’s plane as it entered Saudi airspace to Jeddah. pic.twitter.com/Vhzxd6ir5p
— ANI (@ANI) April 22, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-सौदी अरेबियामधील रणनीतीक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासह अध्यक्षपद भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीुनसार, ही बैठक द्विपक्षीय संबंधांना चालना देणारी आहे. सौदीला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, भारत- सौदी अरेबियासोबत आपल्या दीर्घकालीन ऐतिहासिक संबंधांना खूप महत्व देतो. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि नागरिकांमधील संबंध यासारख्या क्षेत्रात भागीदारीला नवीन गती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय हज यात्रेकरुंच्या कोट्यासाठी आणि इतर सुव्यस्थावेर चर्चा करणार आहेत. सौदी अरेबियातील भारतीय राजदूत सुहेल अजाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि सौदी अरेबियामधील कनेक्टिव्हिटीसाठी जेद्दाह एक महत्वपूर्ण शहर आहे. हे शहर दोन्ही देशांमधील व्यापारासाठी प्रमुख बंदर आहे. तसेच या ठिकणी मक्काचे प्रवेशद्वार देखील आहे. अमरा आणि हज यात्रेसाठी येणार प्रत्येक व्यक्ती प्रथम जेद्दाल मार्गे मक्काला जातो.