Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बंगालच्या उपसागरात सर्वात लांब किनारपट्टी भारताची…’, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला दाखवला आरसा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये बिमस्टेक परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेदरम्यान बांगलादेश चिकन नेकवरुन सुनावले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 03, 2025 | 04:54 PM
S. Jaishankar's 'cherry-picking' jab at Yunus's Northeast 'landlocked' claim

S. Jaishankar's 'cherry-picking' jab at Yunus's Northeast 'landlocked' claim

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये बिमस्टेक परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेदरम्यान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारताच्या पूर्वोत्तर भागाला चिकन नेक वर अबलंबून असल्याचे म्हटले. तसेच बंगालच्या उपसागराचा बांगलादेश एकमेव संरक्षक असल्याचा दावा ही त्यांनी केला होता. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंयक यांनी युनूस यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या सामर्थ्याचे आणि भौगोलिकतेचे स्पष्टीकरण देत एस जयशंकर यांनी युनूस यांना खडे बोल सुनावले.

तसेच जयशंकर यांनी हेही स्पष्ट केले की, भारत बिमस्टेक च्या जबाबदाऱ्यांबाबत पूर्णत: जागरुक आहे. भारताची बांगालच्या उपसागरात सर्वात लांब किनारपट्टी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय भारताचा पूर्वोत्तर भाग रेल्वे, रस्ते, जलमार्ग, उर्जा ग्रीड आणि पाइपलाइन नेटवर्कद्वारे BIMSTEC साठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या भाग एक महत्वाचे केंद्र बनत आहे. तर त्रिपक्षीय भाग पूर्ण झाल्यानंतर भाताच्या पूर्वोत्तर भागासी प्रशांत महासागर जोडला जाईल. हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- PM मोदी थायलंडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले; द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर होणार चर्चा

काय म्हणाले होते मोहम्मद युनूस ?

अलीकडचे मोहम्मद यूनूस यांनी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान युनूस यांनी भारताच्या पूर्वोत्तर राज्यांबाबत खबळजनक विधान केले. युनूस यांनी म्हटले की, भारताच्या या पूर्वोत्तर भागाला लॅंडलॉक्ड क्षेत्र म्हणून संबोधले. त्यांनी दावा केला की, भारताच्या पूर्वोत्तर भागाला समुद्रातपर्यंत पोहोचण्यासाठी बांगलादेशच एकमेव मार्ग आहे. यामुळे त्यांनी चीनला या भागात मोठी गुंतवणूकचे करण्याची संधी असल्याचे सुचवले.

त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. भारतातून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान एस जयशंकर यांनी त्यांच्या या विधानावर त्यांना आरसा दाखवत स्पष्ट केले की, भारत केवळ स्वत:साठीच नाही तर संपूर्ण BIMSTEC प्रांतासाठी स्थिरता आणि सहकार्यावर भर देते. भारताने या संघटनेच्या विकासासाठी गेल्या दशकभरात अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच भारत भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि महत्वाचा आहे.

काय आहे ‘चिकन नेक’?

चिकन नेक याला सिलीगुडी कॉरिडोरही म्हटले जाते. हा भाग 20-22 किमी रुंद आणि 60 किमी लांब आहे. हा मार्ग भारताच्या मुक्य भूमाला पूर्वोत्तर राज्यांशी जोडतो. धोरमात्मक दृष्टीने हा प्रदेश अत्यंत महत्वाचा असून नेपाळ, भूतान, बांगलादेश आण चीन या देशांनी वेढलेला आहे. यटामुळे भारतासाठी हा मार्ग जीवनवाहिनी आहे. भारताचा पूर्वोत्तर भाग केवळ बांगलादेशवर अवलंबून नसून स्वत:च्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांद्वारे अधिक सक्षम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Trump tariffs: ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत पण…’; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादला 26% कर

Web Title: S jaishankars cherry picking jab at yunuss northeast landlocked claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Bangladesh
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.