Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Crisis 2026: सौदी अरेबिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात महागड्या प्रकल्पावर प्रिन्स सलमान यांनी मारली पलटी

Saudi Arabia News : सौदी अरेबियाचा अब्जावधी डॉलर्सचा निओम प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला आहे. प्रिन्स सलमान यांचे व्हिजन 2030 आता फक्त चार वर्षे दूर आहे. सौदी अरेबिया अर्थव्यवस्थेत परिवर्तन करण्यात अपयशी ठरला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 25, 2026 | 01:59 PM
saudi arabia economic crisis neom project failure mbs foreign policy shift 2026

saudi arabia economic crisis neom project failure mbs foreign policy shift 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • निओम प्रकल्पाला ब्रेक
  • परराष्ट्र धोरणात मोठा बदल
  • इराण आणि अमेरिकेशी तणाव

Saudi Arabia economy crisis 2026 : जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश म्हणून ओळखला जाणारा सौदी अरेबिया (Saudi Arabia) सध्या एका विचित्र वळणावर उभा आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी देशाला आधुनिक बनवण्यासाठी जो ‘व्हिजन २०३०’ चा नकाशा मांडला होता, त्याला आता तडे जाताना दिसत आहेत. अब्जावधी डॉलर्स खर्च करूनही ‘निओम’ (NEOM) हे स्वप्नवत शहर प्रत्यक्षात उतरण्यात अपयश येत असल्याने सौदीची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. या आर्थिक संकटामुळे प्रिन्स सलमान यांचे परराष्ट्र धोरणही अचानक आक्रमक आणि बदललेले दिसत आहे.

निओम प्रकल्प: स्वप्न की आर्थिक दिवाळखोरी?

सौदी अरेबियाने तेलावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी १७० किलोमीटर लांब ‘द लाईन’ (The Line) शहराचे स्वप्न जगाला दाखवले होते. मात्र, ताज्या अहवालांनुसार हा प्रकल्प तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे मर्यादित करण्यात आला आहे. सुमारे $१०० अब्ज खर्च करूनही या शहराचा केवळ काही किलोमीटरचा भाग पूर्ण होण्याची शक्यता आहे. निओमच्या अपयशामुळे गुंतवणूकदारांचा सौदीवरील विश्वास उडाला असून, देशाच्या गंगाजळीवर मोठा ताण आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा

इस्रायल आणि युएईशी का दुरावले संबंध? 

काही वर्षांपूर्वीपर्यंत इस्रायलशी हातमिळवणी करण्यास उत्सुक असलेला सौदी अरेबिया आता अचानक इस्रायलविरोधी भूमिका घेत आहे. सौदीच्या सरकारी माध्यमांमधून आता उघडपणे इस्रायलच्या धोरणांचा निषेध केला जात आहे. इतकेच नाही तर आपला जवळचा मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबतही सौदीचे खटके उडत आहेत. येमेनमध्ये सौदी हवाई दलाने चक्क युएईच्या तळांवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. युएई आणि इस्रायलच्या वाढत्या जवळिकीला (Zionist Project) सौदी आता स्वतःच्या सुरक्षेसाठी धोका मानू लागला आहे.

Neom, Saudi Arabia’s planned city, was an ambitious project intended to showcase the country’s efforts to transition from oil to a digital economy. But Mohammed bin Salman’s utopian city was undone by the laws of physics and finance. https://t.co/QL6hAYvhDc pic.twitter.com/ZY50q7jZPO — Financial Times (@FT) November 6, 2025

credit – social media and Twitter

मुस्लिम ब्रदरहूड आणि पाकिस्तानशी जवळीक 

प्रिन्स सलमान यांनी २०१४ मध्ये ज्या मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना घोषित केले होते, त्यांच्याशी आता सौदीचे संबंध सुधारताना दिसत आहेत. सुदानमधील यादवी युद्धात सौदीने उघडपणे बुरहान यांच्या सैन्याला पाठिंबा दिला आहे, जे मुस्लिम ब्रदरहूडशी संबंधित मानले जातात. याव्यतिरिक्त, पाकिस्तानला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी $१.५ अब्ज देण्याचा निर्णय आणि त्याबदल्यात पाकिस्तानचे कर्ज माफ करणे, या हालचाली सौदी अरेबिया आता आपली ‘स्वतंत्र’ ओळख निर्माण करत असल्याचे दर्शवतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

ट्रम्प प्रशासनावर दबाव आणि इराण फॅक्टर

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी इराणविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सौदी चिंतेत आहे. १९७९ पासून इराणचे कट्टर शत्रू राहिलेले सौदी आता ट्रम्प प्रशासनाला इराणवर हल्ला न करण्यासाठी विनवणी करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, जर इराणवर हल्ला झाला तर त्याचे पडसाद सौदीच्या तेल विहिरींवर उमटतील आणि आधीच आर्थिक संकटात असलेला देश पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती प्रिन्स सलमान यांना वाटत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाचा 'निओम' प्रकल्प का अपयशी ठरला?

    Ans: अफाट खर्च ($१ ट्रिलियन), तांत्रिक आव्हाने आणि गुंतवणूकदारांची कमतरता यामुळे निओम आणि 'द लाईन' प्रकल्पाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात कमी करण्यात आली आहे.

  • Que: सौदी आणि युएई (UAE) मध्ये वाद का होत आहेत?

    Ans: येमेनमधील वर्चस्व, तेल उत्पादन मर्यादा आणि इस्रायलशी असलेल्या संबंधांवरून दोन्ही देशांतील स्पर्धा आता उघड संघर्षात बदलली आहे.

  • Que: सौदी अरेबिया इराणवर हल्ला करण्याच्या विरोधात का आहे?

    Ans: युद्ध झाल्यास सौदीच्या तेल क्षेत्राला आणि आर्थिक हितसंबंधांना मोठी झळ पोहोचू शकते, म्हणून सौदी अमेरिकेला इराणपासून दूर राहण्यास सांगत आहे.

Web Title: Saudi arabia economic crisis neom project failure mbs foreign policy shift 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • international news
  • Saudi Arabia
  • Saudi Crown Prince
  • UAE

संबंधित बातम्या

Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा
1

Andaman Military Project: भारताने आवळला चीनचा गळा; ग्रेट निकोबार 10 अब्ज डॉलर्सच्या महाप्रकल्पामुळे ड्रॅगॉनच्या पोटात गोळा

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक
2

Article 5 : इतिहासाची थट्टा! 9/11 नंतरच्या मदतीवर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे जॉर्जियो मेलोनी आक्रमक

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन
3

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन

China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा
4

China Crisis: शी जिनपिंग यांचा जीव धोक्यात? भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्याच सैन्याचा नरसंहार; चीनमध्ये सत्तास्थैर्याला हादरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.