
Saudi Arabia is building the world's tallest building breaking the Burj Khalifa's record and will be over 1 km tall
Jeddah Tower Saudi Arabia latest news 2025 : मानवी कल्पनाशक्ती आणि अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना सध्या सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) वाळवंटात आकाराला येत आहे. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’चा विक्रम आता लवकरच मोडीत निघणार आहे. सौदी अरेबियाने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘जेद्दाह टॉवर’ (Jeddah Tower) प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, ही इमारत चक्क १,००० मीटर (१ किलोमीटर) पेक्षा जास्त उंच असणार आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एखादी इमारत एक किलोमीटरची उंची ओलांडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या ‘मॅगा प्रोजेक्ट’कडे लागले आहे.
सध्या दुबईतील बुर्ज खलिफा ८२८ मीटर उंचीसह जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिरवत आहे. मात्र, जेद्दाह टॉवर त्यापेक्षा साधारण १७२ ते १८० मीटरने अधिक उंच असेल. या इमारतीची रचना बुर्ज खलिफाचेच सह-डिझाइनर एड्रियन स्मिथ यांनी केली आहे. वाळवंटातील जोराचे वारे आणि उष्णता सहन करण्यासाठी या टॉवरला विशिष्ट ‘थ्री-पेयड’ (Three-sided) आकार देण्यात आला आहे. २०२५ मध्ये या प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाले असून, आतापर्यंत ८० मजले दिमाखात उभे राहिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, जेद्दाह टॉवरच्या बांधकामाचा वेग थक्क करणारा आहे. दर तीन ते चार दिवसांत एक नवा मजला पूर्ण केला जात आहे. या टॉवरमध्ये एकूण १६० पेक्षा जास्त मजले असतील. यामध्ये जगातील सर्वात उंच ‘ऑब्झर्व्हेशन डेक’ असेल, जिथून लाल समुद्र (Red Sea) आणि संपूर्ण जेद्दाह शहराचे विहंगम दृश्य दिसेल. प्रवासासाठी यामध्ये अशा लिफ्ट्स असतील ज्या प्रति सेकंद १० मीटर वेगाने धावतील. लक्झरी हॉटेल्स, आलिशान अपार्टमेंट्स आणि जागतिक दर्जाची कार्यालये या इमारतीचे वैभव वाढवतील.
Saudi Arabia resumes construction on $26B Jeddah Tower to rise over 1 km as world’s tallest skyscraper. pic.twitter.com/wxt6uFd4bU — Globe Eye News (@GlobeEyeNews) August 9, 2025
credit : social media and Twitter
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांच्या ‘व्हिजन २०३०’ चा हा टॉवर एक अविभाज्य भाग आहे. सौदी अरेबियाला केवळ तेलावर अवलंबून न ठेवता, पर्यटनाचे आणि व्यापाराचे जागतिक केंद्र बनवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेद्दाह इकॉनॉमिक सिटीमध्ये हा टॉवर केंद्रस्थानी असेल. विशेष म्हणजे, सौदी अरेबिया इथेच थांबणार नाहीये; भविष्यात २ किलोमीटर उंचीचा ‘राईज टॉवर’ (Rise Tower) बांधण्याची योजना देखील त्यांनी आखली आहे, जे मानवी प्रगतीचे शिखर मानले जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Military : नेतान्याहू घेणार सूड! भूमध्य समुद्रात एर्दोगान यांची नाकेबंदी करण्यासाठी इस्रायलचा ‘मास्टरप्लॅन’
जेद्दाह टॉवर केवळ उंचीसाठीच नाही, तर आपल्या शाश्वत तंत्रज्ञानासाठीही ओळखला जाईल. वाळवंटातील कडक उन्हात इमारतीचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी प्रगत कूलिंग सिस्टम आणि ऊर्जा-कार्यक्षम काचांचा वापर करण्यात आला आहे. २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यानंतर हा टॉवर मानवी प्रगतीचे नवीन जागतिक प्रतीक ठरेल.
Ans: सौदी अरेबियातील 'जेद्दाह टॉवर' (Jeddah Tower) ही जगातील सर्वात उंच इमारत होणार आहे, ज्याची उंची १,००० मीटरपेक्षा जास्त असेल.
Ans: जेद्दाह टॉवर हा दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा (८२८ मीटर) सुमारे १७२ ते १८० मीटर अधिक उंच असेल.
Ans: ताज्या अपडेट्सनुसार, जेद्दाह टॉवरचे बांधकाम २०२८ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.