Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crude Oil: उच्चस्तरीय जागतिक रणनीती! चार टँकर, लाखो बॅरल तेल गुप्त मार्गाने पाठवून ‘या’ मुस्लिम देशाने जिंकले भारताचे मन

Saudi Oil To India: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने तांबड्या समुद्रामार्गे भारताला तेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भारताला तेलाचा नियमित पुरवठा सुनिश्चित होईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 18, 2026 | 11:09 AM
saudi arabia supplies oil to india via red sea yanbu port avoiding hormuz crisis marathi

saudi arabia supplies oil to india via red sea yanbu port avoiding hormuz crisis marathi

Follow Us
Follow Us:
  • सौदीची मोलाची साथ
  • लाखो बॅरलचा पुरवठा
  • ऊर्जा संकटातून दिलासा

Saudi Oil Supply India 2026 : मध्यपूर्वेत सध्या बारुदाचा वास पसरला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष (US-Israel Iran War) आता टोकाला पोहोचला असून, जगाची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी आता युद्धाचं रणांगण बनली आहे. या युद्धामुळे जगात मोठे ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती असतानाच, भारतासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आली आहे. भारताचा जुना मित्र असलेल्या सौदी अरेबियाने या कठीण काळात भारताची साथ निभावली आहे. होर्मुझचा मार्ग असुरक्षित झाल्याने सौदीने आता आपल्या ‘यान्बू’ (Yanbu) बंदरातून तांबड्या समुद्रामार्गे भारताला तेलाचा पुरवठा सुरू केला आहे.

होर्मुझचा धोका आणि सौदीचा ‘मास्टरस्ट्रोक’

जगातील सुमारे २० टक्के तेल व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. मात्र, इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने आणि अमेरिकेने १७ मार्चला इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे हा मार्ग आता ‘नो-गो झोन’ बनला आहे. अशा स्थितीत भारताची तेलाची गरज पूर्ण करण्यासाठी सौदीने आपली १,२०० किलोमीटर लांबीची पाइपलाइन सक्रिय केली आहे. या पाइपलाइनद्वारे तेल प्रथम सौदीच्या पश्चिम किनारपट्टीवरील यान्बू बंदरात आणले जाते आणि तिथून ते टँकरद्वारे थेट भारताकडे पाठवले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait: महासत्ता हतबल नाही तर आक्रमक! अमेरिकेचे 5,000 पौंडांचे ‘बंकर बस्टर’ बरसले इराणच्या छाताडावर; जमिनीखालचे तळ बेचिराख

केप्लरचा अहवाल: समुद्रात ४ महाकाय टँकर्सचा थरार

जागतिक तेल हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘केप्लर’ (Kpler) या संस्थेच्या अहवालानुसार, सौदी अरेबियाने आधीच ४ मोठे टँकर भारतासाठी रवाना केले आहेत. यामध्ये अंदाजे ६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे. इतकेच नाही तर, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी ९ ते १० दशलक्ष बॅरल तेल भारताला मिळण्याची शक्यता आहे. सौदीच्या या पावलामुळे भारतीय बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल आणि सामान्य जनतेला महागाईच्या झळा बसणार नाहीत.

🚨 While the world panicked about the Strait of Hormuz, Saudi Arabia already had a backup plan. A 1,200 km pipeline across the desert
Persian Gulf ➝ Red Sea
Built in 1981 to bypass Hormuz entirely. Now running at full capacity. Up to 7 million barrels of oil per day flowing… pic.twitter.com/cfsQywKVwv — Mossad Commentary (@MOSSADil) March 15, 2026

credit – social media and Twitter

लाल समुद्रातील आव्हाने आणि हुथी बंडखोरांचा धोका

सौदीने निवडलेला हा तांबड्या समुद्राचा मार्ग सोपा नाही. ‘बाब अल-मंदेब’ (Bab al-Mandab) जवळ हुथी बंडखोरांकडून जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचा धोका अजूनही कायम आहे. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील थेट युद्धापेक्षा हा मार्ग सध्या भारतासाठी अधिक सुरक्षित मानला जात आहे. सौदी अरेबियाने आपल्या पाइपलाइनची क्षमता मर्यादित असूनही भारताला प्राधान्य दिले आहे, हे विशेष. यामुळे भारत आणि सौदी अरेबियामधील द्विपक्षीय संबंध किती मजबूत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dhurandhar 2: कॅनडा-फिनलँड राष्ट्राध्यक्षांनाही ‘धुरंधर’ची भुरळ; लंडनच्या रस्त्यांवरील ‘त्या’ VIRAL VIDEOची चर्चा संपूर्ण जगभर

भारतासाठी याचे महत्त्व काय?

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८० टक्क्यांहून अधिक भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. होर्मुझचा मार्ग बंद होणे म्हणजे भारतासाठी आर्थिक आणीबाणीसारखी परिस्थिती होती. मात्र, सौदी अरेबियाने ‘यान्बू’ मार्ग उघडून भारताला मोठा आधार दिला आहे. यामुळे देशातील ऊर्जा सुरक्षा (Energy Security) अबाधित राहिली आहे. इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध किती काळ चालेल हे सांगता येत नसले तरी, सौदीच्या या मैत्रीमुळे भारताचा तेलाचा साठा सुरक्षित आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया भारताला कोणत्या मार्गाने तेल पाठवत आहे?

    Ans: सौदी अरेबिया होर्मुझची सामुद्रधुनी टाळून तांबड्या समुद्रामार्गे (Red Sea) आपल्या 'यान्बू' बंदरातून भारताला तेल पुरवठा करत आहे.

  • Que: सध्या किती तेल भारताच्या दिशेने येत आहे?

    Ans: केप्लरच्या अहवालानुसार, ६ दशलक्ष बॅरल तेल घेऊन ४ टँकर निघाले असून मार्च अखेरपर्यंत एकूण १५-१६ दशलक्ष बॅरल तेल मिळण्याची अपेक्षा आहे.

  • Que: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल का येत नाहीये?

    Ans: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे हा मार्ग अत्यंत असुरक्षित झाला असून १७ मार्चला अमेरिकेने तिथे इराणच्या तळांवर बॉम्बहल्ला केला आहे.

Web Title: Saudi arabia supplies oil to india via red sea yanbu port avoiding hormuz crisis marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • India news
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट
1

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख
2

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
3

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
4

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.