
shehbaz sharif x post controversy us draft message iran crisis pakistan mocked 2026
Shehbaz Sharif X post edit history : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif )सध्या एका विचित्र आणि मानहानीकारक परिस्थितीचा सामना करत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्यासाठी आपण खूप मोठे ‘जागतिक नेते’ आहोत, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला आहे. मंगळवारी शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणवरील हल्ल्याची डेडलाईन वाढवण्याची विनंती केली होती. मात्र, ही पोस्ट ज्या प्रकारे केली गेली, त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतंत्र नसून ते अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचे उघड झाले आहे.
कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची टीम जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करते, तेव्हा ती अत्यंत सावध असते. मात्र, शहबाज शरीफ यांच्या टीमने एक मोठी चूक केली. त्यांनी मूळ मसुदा पोस्ट केला आणि नंतर तो एडिट केला. ‘X’ वरील एडिट हिस्ट्री तपासली असता धक्कादायक बाब समोर आली. शरीफ यांच्या मूळ पोस्टच्या वरच्या बाजूला “मसुदा – पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून X यांना संदेश” (Draft – Message from PM of Pakistan to X) असे लिहिले होते. तज्ज्ञांच्या मते, हा मसुदा अमेरिकेतील ट्रम्प यांच्या टीमकडून किंवा व्हाईट हाऊसच्या जवळच्या वर्तुळातून पाकिस्तानला पाठवण्यात आला होता आणि शरीफ यांच्या टीमने तो जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला.
हे देखील वाचा : National Zoo Lovers Day 2026: प्राणीसंग्रहालयाची सफर का आहे खास? मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी आजचा दिवस देतोय ‘हा’ मोठा संदेश
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या पोस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जेडी व्हान्स, मार्को रुबियो आणि स्टीव्ह विटकॉफ यांसारख्या मोठ्या नेत्यांना टॅग करण्यात आले होते. सोशल मीडिया युजर्सनी असा दावा केला आहे की, “मसुदा: पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून” असे शब्द पाकिस्तानची स्वतःची टीम कधीच वापरणार नाही. हे शब्द स्पष्टपणे सूचित करतात की हा संदेश बाहेरून आला आहे. “शहबाज शरीफ व्हाईट हाऊसने दिलेले निर्देश पोस्टमधून हटवायला विसरले आणि स्वतःचे हसू करून घेतले,” अशी टीका नेटकरी करत आहेत.
Who is controlling the messaging of Pakistan’s puppet PM Shehbaz Sharif? pic.twitter.com/5asTZzSNOn — علی مصطفی | Ali Mustafa (@Ali_Mustafa) April 7, 2026
credit – social media and Twitter
या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये आणि जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक पाकिस्तानी युजर्सनी संताप व्यक्त करत विचारले आहे की, “आमचा देश आता अमेरिकेची वसाहत झाला आहे का?” डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवत असल्याचे या पोस्टवरून स्पष्टपणे जाणवते. इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचे आवाहन करणे आणि ट्रम्प यांना डेडलाईन वाढवण्याची ‘विनंती’ करणे, ही सर्व स्क्रिप्ट ट्रम्प यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली होती, असा संशय बळावला आहे.
The implication here, is if the US asked Pakistan to post this: * Pakistan is acting as a US puppet, not a neutral negotiator. * The US was in the weak position with Trump’s deadline and desperate for an out. * Iran was holding firm. Continues to erode Trump’s credibility and… https://t.co/z6GKvODZ8h — Adam Cochran (adamscochran.eth) (@adamscochran) April 7, 2026
credit – social media and Twitter
हे देखील वाचा : BabyMassageDay : बाळाचे स्नायू होतील लोखंडासारखे मजबूत! ‘बाळ मालिश दिनानिमित्त’ जाणून घ्या मालिशचे 7 गुप्त फायदे
कोणत्याही सार्वभौम देशाच्या प्रमुखाचा संदेश दुसऱ्या देशाने लिहून देणे, ही त्या देशासाठी अत्यंत शरमेची बाब मानली जाते. शरीफ यांनी ही पोस्ट एडिट करून चूक सुधारण्याचा प्रयत्न केला असला, तरी स्क्रीनशॉट्सनी आधीच जगभर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली आहे. या एका पोस्टमुळे पाकिस्तान आता ‘जागतिक शांततादूत’ राहिला नसून अमेरिकेची ‘कठपुतळी’ बनला आहे, हे सिद्ध झाले आहे. यावर पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Ans: शरीफ यांनी इराण संकटावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेकडून आलेला 'ड्राफ्ट संदेश' जसाच्या तसा पोस्ट केल्याचे एडिट हिस्ट्रीवरून उघड झाले आहे.
Ans: एडिट हिस्ट्रीमध्ये "मसुदा: पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून संदेश" असे शब्द दिसले, जे बाहेरून (संभाव्यतः अमेरिकेतून) पाठवण्यात आले होते.
Ans: पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेच्या स्क्रिप्टनुसार चालतात आणि त्यांचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण संपले आहे, अशी टीका जगभरात होत आहे.