Shubhanshu Shukla’s Axiom-4 mission Rescheduled on June 19, says ISRO
भारतीय अंतराळवीर शुभांशू शक्ला यांचे Axiom-4 मोहीमही हवामानच्या अनुकूल परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान इस्रोने या मोहीमेची नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर केली आहे. शुभांशू शुक्लपा Axiom-4 मोहीमेसाठी प्रवासाची तयारी करत आहे. लवकरच भारतीय इतिहासात एक नवीन इतिहास रचला जाणार आहे. १९ जून २०२५ रोजी Axiom-4 या अंतराळ मोहीमेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. याचे प्रक्षेपणअमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पोस सेंटरमधून होणार आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या रॉकेटने शुभांशू शुक्ला आणि या मोहीमेतील इतर अंतराळवीर प्रक्षेपण करतील.
या मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला २९ मे रोजी उड्डाण घेणार होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम ८ जूनसाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतरही अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत होते. यामुळे ही मोहीम १० जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा हवामानाच्या अनुकूल परिस्थितीमुळे ही मोहीम ११ जूनवरुन पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान इस्रोने या मोहीमेच्या प्रक्षेपणासाठी यावेळी १९ जून ही तारिख निश्चित करण्यात आली आहे.
Axiom-4 या मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. १९४८ मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांच्यानंतर या मोहीमेत शुभांशू शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. ही मोहीम भारताची अंतराळातील वाढती ताकद आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे. या मोहीमेसाठी शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम पाहणार आहेत.
या मोहीमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे प्रदर्शन करणार आहे. हे मिशन १४ दिवसांचे असणार आहे. यामध्ये विज्ञाशी संबंधित प्रयोग, शैक्षणिक कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम राबवले जाणार आहे.
या मोहीमेत शुभांशू शुक्ला यांच्या सोबत नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहीमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू या मोहीमेत सहभागी होणार आहेत. ही मोहीम भारतासाठी अत्यंत खास ठरणार आहे.
१० ऑक्टोबर १९८५ रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे जन्मलेले शुभांरा शुक्ला यांची जून २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलाच्या फायटर विंगमध्ये नियुक्त करण्यात आली, तेव्हापासून एक लडाऊ आणि अनुभवी पायलट म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याकडे एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-३२ यासह विविध विमानांचा २००० तासांचा प्रभावी उहाण अनुभव आहे.