युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या
Russia Ukraine war : मागीत तीन-साडेतीन वर्षांपासून रशिया- युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या मैदानातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युक्रेनियन सैन्यात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत युक्रेनियन सैन्यात महिला सैनिकांची संख्या एक लाखांवर पोहचली आहे. सध्या युक्रेनच्या सशस्त्र दलात एकूण १० लाखांहून अधिक सैनिक कार्यरत आहेत.
सशस्त्र दल सल्लागार ओक्साना ग्रिगोरीएवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्यदलात सध्यासाडेपाच हजार महिला थेट आघाडीवर रशियन सैन्याशी लढत आहेत. या महिला ड्रोन ऑपरेशनपासून ते तोफेच्या संचालनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या मोठ्या शिताफीने पार पाडत आहेत. इतकेच नव्हे तर, वैद्यकीय मदत, युद्धसामग्री वाहतूक आदी सहाय्यक जबाबदाऱ्यांमध्येती त्या मोलाची भूमिका बजावत आहेत.
२०२२ मध्ये रशियाने युक्रेनविरोधात युद्धाचे रणशिंग फुंकले. रशियन आक्रमण होण्यापूर्वी युक्रेनियन सैन्यात महिलांचे प्रमाण सुमारे १५ टक्के होते. मात्र आता त्यात दुपटीने वाढ झाली आहे. लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सध्या २० टक्के विद्यार्थीनी दाखल आहेत, असे ग्रिगोरीएवा यांनी सांगितले.
येमेनमध्ये भीषण सुमद्री दुर्घटना ; किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
माजी व्यावसायिक हेप्टाथलीट अलिना शुख हिने सुरुवातीला अझोव्ह ब्रिगेडमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला, परंतु पदे उपलब्ध नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला. नंतर तिने खार्तिया ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला. खार्तिया ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतल्यानंतर’ ‘मी माझ्या ब्रिगेडमधील अनेक पुरुष सैनिकांपेक्षा अधिक बलवान आहे.” अशी उत्फुर्त प्रतिक्रीयाही तिने यावेळी दिली. तर तोफखाना विभागाच्या कमांडर ओल्हा बिहार म्हणाल्या की, “तंत्रज्ञानामुळे युद्धाची दिशा बदलत आहे. आता सर्वोत्तम सैनिक तो असतो, जो वेगाने ड्रोन चालवू शकतो. मला आशा आहे की मी एक दिवस देशाची संरक्षण मंत्री बनेन.”
‘अदृश्य बटालियन’ संशोधन प्रकल्पाशी संलग्न असलेल्या मारिया बर्लिंस्का यांनी महिलांसाठी लढाऊ भूमिका खुल्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत. ”प्रत्येक युद्धाने तांत्रिक प्रगतीसह महिलांच्या स्वातंत्र्यालाही चालना दिली आहे. जरी महिलांना सुरुवातीला स्वयंपाकी आणि सफाई कामगार म्हणून नोंदवले गेले, तरी प्रत्यक्षात अनेक महिला रणभूमीत लढत आहेत. विशेष बाब म्हणजे महिलांच्या भरतीबाबत अद्याप कोणताही राजकीय वाद उभा राहिलेला नाही.
युक्रेनियन सैन्यातील महिला ड्रोन युनिटमध्ये काम करणारी कमांडर ट्विग आणि तिच्या पाच महिला सहकारी रणभूमीवर ड्रोनद्वारे युद्ध लढत आहेत. ट्विगच्या सहकारी टायटन म्हणते, “’हत्या’ हा शब्द चुकीचा आहे. आम्ही शत्रूचा उच्चाटन करतो. सैनिक मारिया बर्लिस्काया म्हणते, “ड्रोन उडवताना मुलगा आणि मुलगी यात कोणताही फरक राहत नाही. कौशल्य हेच खरे महत्त्वाचे.”