अमेरिकेच्या संसदेत भारतीयांचा बोलबाला; इतिहासात पहिल्यांदाच 'हे' सहा नेते करणार प्रतिनिधित्व
वॉश्गिंटन: भारतीय नागरिक केवळ आपल्या देशातच नव्हे, तर परदेशातही आपली ओळख निर्माण करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या संसदेत भारतीय वंशाच्या सहा नेत्यांची एकत्र शपथविधी. ही अमेरिकन इतिहासातील पहिलीच वेळ असून यामध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सहा सदस्यांनी प्रतिनिधी सभेत आपले स्थान निर्माण केले आहे. या नेत्यांमध्ये डॉ. अमी बेरी, सुहास सुब्रमण्यन, श्री थानेदार, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ति आणि प्रमिला जयपाल यांचा समावेश आहे.
अमी बेरी यांचा अभिमानाचा क्षण
डॉ. अमी बेरी यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे की, “12 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेली मी भारतीय-अमेरिकन समुदायाचा एकमेव प्रतिनिधी होतो. पण आज आम्ही सहा जण आहोत. मला आशा आहे की पुढील वर्षांमध्येही आपल्या समुदायातील अधिक लोक अमेरिकन संसदेत पोहोचतील.” त्यांनी सातव्यांदा कॅलिफोर्नियातून प्रतिनिधी म्हणून शपथ घेतली आहे.
When I was first sworn in twelve years ago, I was the sole Indian American Member of Congress and only the third in U.S. history.
Now, our coalition is six strong!
I am excited to welcome even more Indian Americans to the halls of Congress in the years to come! pic.twitter.com/CpLVST2g7H
— Ami Bera, M.D. (@RepBera) January 3, 2025
अन्य नेत्यांची कामगिरी
तसेच सुहास सुब्रमण्यन यांनी प्रथमच अमेरिकेत प्रतिनिधी सभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि हाऊस स्पीकर माइक जॉनसन यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांनी म्हटले, “आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे. अमेरिकन संसदेत शपथ घेणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”रो खन्ना, राजा कृष्णमूर्ति आणि प्रमिला जयपाल यांनी पाचव्यांदा सतत शपथ घेतली आहे. या सर्व नेत्यांनी अमेरिकन संसदेत भारतीय समुदायाची छाप उमटवली आहे आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे स्थान मजबूत केले आहे.
माइक जॉनसन यांना पुन्हा एकदा हाऊस स्पीकरप म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांनी संसदेत 218 नते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी हकीम जेफ्रीझ यांना 215 मते मिळाली आहेत. विजय माइक यांच्यासाठी मोठी संधी आहे. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी निवडणुकीच्या आधी त्यांनी विरोध केला होता, मात्र यावर त्यांनी मात करत हा विजय मिलवला. भारतीय-अमेरिकन समुदायाचा अमेरिकन संसदेत वाढलेला प्रभाव हा दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि राजकीय संबंध दृढ होण्याचे द्योतक आहे.