(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेल अवीव: सीरियातील असदच्या सत्त्तापालटानंतर इस्त्रायलने अनेक गुप्त कारवाया केल्या. यावेळी इस्त्रायलला सीरियामध्ये इराणने विकसित केलेल्या एका मोठ्या भूमिगत मिसाइल उत्पादन केंद्र इस्त्रायलने अंडरकव्हर ऑपरेशनद्वारे नष्ट केले असल्याचे म्हटले आहे. या अत्यंत गुप्त ऑपरेशनमध्ये इस्त्रायली लष्कराच्या 120 कमांडोंचा सहभाग होता. या मिशनचे कोडनेम “ऑपरेशन मेनी वेज” ठेवण्यात आले होते, आणि 8 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या या मोहिमेने इराणच्या पश्चिम सीरियातील मसयाफ भागातील या अड्ड्याला लक्ष्य केले.
इराणचा भूमिगत प्रकल्प
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने ही सुविधा मसयाफ भागात डोंगराच्या आत, 70-130 मीटर खोल भूमिगत तयार केली होती. 2017 मध्ये जमरायातील एका ओव्हरग्राउंड मिसाइल प्लांटवर इजरायलने हवाई हल्ला केल्यानंतर इराणने भविष्याच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपली मिसाइल उत्पादन केंद्रे भूमिगत हलवली. 2021 पर्यंत हे भूमिगत उत्पादन केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले होते. मात्र, इस्त्रायलने अवघ्या 48 तासांत इराणचा हा प्रकल्प उद्धवस्त केला आहे. इस्त्रायलने म्हटले आहे की, इराण या ठिकाणाहून हमास, हिजबुल्लाह आणि सीरियासाठी क्षेपणास्त्र पुरवत होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण आहे जब्बार? ज्याने अमेरिकेत गोळीबार करुन माजवली दहशत, जाणून घ्या
प्रकल्पाचे उदिष्ट्य
“डीप लेयर” नावाने ओळखले जाणारे हे केंद्र घोड्याच्या नालाच्या आकाराचे असून त्याला तीन प्रमुख प्रवेशद्वारे आहेत. या ठिकाणी कच्च्या मालासाठी, तयार मिसाइलसाठी, आणि कार्यालयीन कामांसाठी स्वतंत्र दरवाजे आहेत. यामध्ये 16 उत्पादन कक्ष असून मिसाइल बॉडी तयार करणे, रॉकेट इंधन मिसळणे, आणि पेंटिंगची व्यवस्था होती. या ठिकाणाहून दरवर्षी 100 ते 300 मिसाइल्स तयार होत होत्या. या मिसाइल्स 300 किमी पर्यंत लक्ष्य भेदण्यास सक्षम होत्या असा दावा इस्त्रायलने केला आहे.
DECLASSIFIED: In September 2024, before the fall of the Assad Regime, our soldiers conducted an undercover operation to dismantle an Iranian-funded underground precision missile production site in Syria.
Watch exclusive footage from this historic moment. pic.twitter.com/s0bTDNwx77
— Israel Defense Forces (@IDF) January 2, 2025
हिजबुल्लाहसाठी धोका
ही सुविधा इराणकडून हिजबुल्लाह आणि सीरियाच्या असद शासनाला प्रगत मिसाइल पुरवण्यासाठी तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. मसयाफ भागातील स्थानामुळे हिजबुल्लाहला सीरियातून थेट मिसाइल मिळवणे शक्य होते. यामुळे, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी हे हिजबुल्लाहला शक्य होते.
इस्त्रायलची यशस्वी कारवाई
इस्त्रायली संरक्षण दल (IDF) ने वर्षानुवर्षे गुप्तचर माहिती गोळा करून या ऑपरेशनची योजना आखली. ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या गाझा, लेबनॉन आणि इतर भागांतील मल्टीफ्रंट युद्धाच्या पार्श्वभूमीवर या ऑपरेशनला गती मिळाली. फक्त तीन तासांत या सुविधेचा संपूर्ण नाश करण्यात आला. विशेष म्हणजे, या मोहिमेत इस्त्रायली दलांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, या यशस्वी हल्ल्यामुळे इराणच्या भूमिगत मिसाइल उत्पादन क्षमतेला जोरदा फटका बसला आहे.