Spain Cancels F-35 Fighter Jet Deal
US F-35 Fighter Jet Deal : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा झटका बसला आहे. युरोपीय देश स्पेनने अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर तुर्कीकडून (Turkey) स्पेनने KAAN लढाऊ विमाने खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
याच वेळी कॅनडा (Canada), पोर्तुगाल, आणि स्वित्झर्लंडसह (Switzarland) अनेक युरोपीय देशही F-35 करारावर पुन्हा एकदा विचार करत असून अमेरिकेसोबत करार रद्द करण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
‘ते अधिकाराचा गैरवापर करत आहेत…’ ; ट्रम्प प्रशासनावर कोणी केले गंभीर आरोप? आणि का?
स्पेनच्या अमेरिकेसोबत लढाऊ विमानाच करार रद्द करण्यामागे अमेरिकन कर, युक्रेनवरील ट्रम्प यांचा यू-टर्न आणि संरक्षणासाठी युरोपचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करणे असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय गेल्या काही काळात अमेरिकेच्या F-35 या लढाउ विमानांचे अनेक अपघात झाले आहे. तसेच यांच्या सॉप्टवेअरमध्ये अपग्रेडलाही विलंब होत आहे. या कारणांमुळे युरोपीय देश अमेरिकेसोबतच्या करारावर पुनर्विचार करत आहेत.
स्पेनने २०२३ च्या आर्थिक खर्चातून लढाऊ विमानांसाठी ६.२५ अब्ज युरो खर्च केले होते. यावेळी स्पेनने युरोच्या युरोफायटर टायफून आणि फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम (FACS) निवडले होते. FACS हा फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील लढाऊ विमानांच्या सहाव्या पिढीतील खरेदीचा संयुक्त प्रकल्प आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवदनानुसार, सध्या स्पेन युरोफायटरमध्ये नवीन तंत्रज्ञानाची वाढ करु इच्छित आहे. यामुळे भविष्यात FACS मध्ये सहभागी होऊन स्पेन सहाव्या पिढीतील लढाऊ विमानांची खरेदी करण्याची शक्यता आहे.
सध्या सहाव्या पिढीतील लढाऊ विमानांचे उत्पादन सुरु झालेले नाही. यामुळे स्पेन पाचव्या पिढीली लढाऊ विमांनाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करत आहे. यामुळेच सुरुवातीला स्पेनने अमेरिकेच्या f-35 च्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांमध्ये रस दाखवला होता. पण सध्या ते तुर्कीकडे KAAN साठी पर्यायी मार्ग म्हणून करार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रश्न १. कोणत्या देशाने अमेरिकेसोबत F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द केला?
युरोपीय देश स्पेनने अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द केला आहे.
प्रश्न २. आणखी कोणते देश अमेरिकेसोबत F-35 लढाऊ विमानाच्या करारवर विचार करत आहेत?
कॅनडा, पोर्तुगाल, आणि स्वित्झर्लंडसह अनेक युरोपीय देशही F-35 करारावर पुन्हा एकदा विचार करत आहेत.
प्रश्न ३. स्पेनने अमेरिकेसोबत F-35 लढाऊ विमानांचा करार का रद्द केला?
युक्रेनवरील ट्रम्प यांचा यू-टर्न आणि संरक्षणासाठी युरोपचे अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करणे ही स्पेनच्या अमेरिकेसोबत करार रद्द करण्यामागची कारणे आहेत.
प्रश्न ४. स्पेन पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी कोणत्या देशाचा विचार करत आहे?
सध्या स्पेन पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी तुर्कीकडे पर्याय म्हणून पाहत आहे.
माउंट एव्हरेस्टवर अचानक हवामान बदल ; जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकले हजारो गिर्यारोहक