माउंट एव्हरेस्टवर अचानक हवामान बदल ; जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकले हजारो गिर्यारोहक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेत पुन्हा एका भारतीयावर हल्ला; व्यावसायिकाची गोळ्या झाडून निघृण हत्या
माउंट एव्हरेस्ट हे गिर्यारोहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे जगातील सर्वात उंच शिखर असून याची उंची ८,८४९ मीटरपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये याला कोमोलांगमा म्हणून ओळखले जाते. सध्या या माउंट एव्हरेस्टच्या ४,९०० मीटर उंचीवरील भागात पूर्वेकडे जोरदार हिमवृष्टी झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवापरासून बर्फवृष्टी जोरात सुरु आहे.
सध्या सर्व पर्वतारोहणाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. खरं तर ऑक्टोबर महिना हा माउंट एवरेस्टवर चढ करण्यासाठी सर्वात सुरक्षित मानला जातो. यावेळी तापामान अगदी सामान्य असते. तसेच आकाशाही स्पष्ट असते. परंतु अचानक झालेल्या या बर्फवृष्टीने अनेकांना धक्का बसला आहे. एका गाइडने म्हटले की, यापूर्वी त्याने कधीही ऑक्टोबरमध्ये हवामान अचानक खराब झाल्याचे पाहिले नव्हते.
सध्या संपूर्ण क्षेत्रात हवामान अत्यंत खराब दिसत आहे. अशा परिस्थितीत पर्यारोहक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट परसली आहे. माउंट एव्हरेस्टच्या भागातील बचाव कार्य सुरु आहे. पण हवामान शांता झाल्यावरच लोकांना बाहेर काढणे सुरक्षित राहिले असे सांगितले जात आहे. सध्या जगभरात अनेक भागांमध्ये चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रश्न १. माउंट एव्हरेस्टवर सध्या किती लोक अडकले आहेत?
तिबेटच्या माउंट एव्हरेस्ट पर्वतावर सध्या १००० लोक पूर्वेकडी भागात अडकले आहे.
प्रश्न २. माउंट एव्हरेस्टवर का अडकले गिर्यारोहक?
माउंट एव्हरेस्टवर पूर्वेकडील भागात ४,९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या प्रदेशात अचानक बर्फवृष्टी झाली यामुळे अनेक पर्वतारोही अडकले आहेत.
प्रश्न ३. माउंट एव्हरेस्टवर अडकलेल्या गिर्यारोहकांच्या बचावासाठी काय केले जात आहे?
माउंट एव्हरेस्टवर अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु खराब हवामानामुळे अडथळा येत आहे. यामुळे हवामान स्थिर झाल्यावर लोकांना वाचवले जाईल असे सांगितले जात आहे.
PM मोदींनी नेपाळच्या पूर दुर्घटनेवर केले दु:ख व्यक्त ; काठमांडूला भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन






