कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump Deploys National Guard : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा त्यांच्याच देशात वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ट्रम्प यांनी ओरेगॉनमध्ये ३०० कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले आहे. त्यांच्या या निर्णयावर देशभरात टिका केली जात आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी त्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
माउंट एव्हरेस्टवर अचानक हवामान बदल ; जोरदार बर्फवृष्टीमुळे अडकले हजारो गिर्यारोहक
रविवारी (०४ ऑक्टोबर) कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी एका फेडरल न्यायालयाने पोर्टलॅंडमध्ये ट्रम्प यांच्या २०० नॅशनल गार्ड तैनातीच्या आदेश रोखला होता. न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबर पर्यंत स्थगित लागू केली आहे. या स्थगितीनंतर गव्हर्नर न्यूसम यांनी देखील नॅशनल गार्ड तैनातीवर न्यायालयात याचिका दाखल करत ट्रम्पविरोधी हेतू स्पष्ट केला आहे. न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयांवर कायदा आणि अधिकाराचा अभूतपूर्व गैरवापर संबोधत निषेध केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन कायदा आणि अधिकारांचा बेशिस्तपणे वापर करत आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांना प्रत्यक्षात आणत आहे. न्यूसम यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ओरेगॉन नॅशनल गार्ड संघीय नियंत्रणाखाली घेण्याच्या निर्णयाला फेडरल कोर्टाने स्थगिती दिली होती. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा ३०० कॅलिफोर्निया नॅशनला गार्ड ओरेगॉनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले की, अशा बेशिस्त आणि हुकूमशाही नेतृत्त्वापुढे जनता शांत बसणार नाही.
After a federal court blocked his attempt to federalize the Oregon National Guard, Donald Trump is deploying 300 California National Guard personnel into Oregon. They are on their way there now. We are taking this fight back to court. The public cannot stay silent in the face… — Governor Gavin Newsom (@CAgovernor) October 5, 2025
न्यूसम यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे देशातील जनतेकडूनही ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध केला जात आहे.याच वेळी व्हाइट हाउसने यावर प्रतिक्रिया देत, ट्रम्प यांनी पोर्टलँडमध्ये हिंसाचार आणि कायदा अंमलबाजवणी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यामुळे ट्रम्प यांनी संघीय मालमत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या कायदेशीर अधिकाराचा वापर केला आहे.
याच वेळी ओरेगॉनच्या डेमोक्रॅटिक गव्हर्नर टीना कोटेक यांनी देखील ट्रम्प यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओरेगॉमध्ये लष्करी हस्तक्षेपाची गरज नाही. बंडखोरी किंवा राष्ट्रीय सुरक्षाला धोका नसून ट्रम्प प्रशासनाच्या कृतींविरोधीत त्यांनी शांततेत निषेध करण्याची परवानगी टीना कोटेक यांनी दिली आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुठे केली नॅशनला गार्डची तैनाती?
ट्रम्प यांनी ओरेगॉनमध्ये ३०० कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रश्न २. ट्रम्प यांच्या या निर्णयावर कोणी केला विरोध?
ट्रम्प यांच्या ओरेगॉनमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्याच्या निर्णयाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि ओरेगॉनच्या गव्हर्नरन टीना कोटेक यांनी केला आहे.
प्रश्न ३. कॅलिफोर्निया गव्हर्नर न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनावर काय आरोप केले?
कॅलिफोर्निया गव्हर्नर न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासन त्यांच्या अधिकारांचा बेकायदेशीरपणे वापर करत असल्याचे म्हटले आहे.
प्रश्न ४. ओरेगॉनच्या गव्हर्नर टीना कोटेक यांनी राज्यात गार्ड तैनातीवर काय प्रतिक्रिया दिली?
ओरेगॉनच्या डेमोक्रॅटिक गव्हर्नर टीना कोटेक यांनी देखील ट्रम्प यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओरेगॉमध्ये लष्करी हस्तक्षेपाची गरज नाही.
प्रश्न ५. ट्रम्प यांचा कोणता निर्णय फेडरला न्यायालयाने स्थगित केला होता?
फेडरल न्यायालयाने पोर्टलॅंडमध्ये ट्रम्प यांच्या २०० नॅशनल गार्ड तैनातीच्या आदेश रोखला होता.
Explainer: इराणच्या चलनातून गायब होणार चार 0000, संसदेने मंजूर केले विधेयक; काय आहे कारण