
sri lanka buddhist monk arrested child abuse drug smuggling 2026
Sri Lanka Buddhist Monk Arrested 2026 : श्रीलंका सध्या एका अत्यंत गंभीर आणि संतापजनक सामाजिक-धार्मिक संकटातून जात आहे. ज्या बौद्ध भिक्षूंना समाजात आदराचे स्थान दिले जाते, त्याच क्षेत्रातील काही वरिष्ठ व्यक्तींवर लागलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपांनी संपूर्ण श्रीलंका (Sri Lanka) हादरून गेली आहे. या घटनांनी केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील अनुराधापुरा या ऐतिहासिक शहरात असलेल्या सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक, ‘अतमस्थान’चे मुख्य पुजारी ७१ वर्षीय पल्लेगामा हेमरत्न यांना पोलिसांनी अटक केली आहे. पल्लेगामा हेमरत्न हे श्रीलंकेतील सर्वात प्रभावशाली धार्मिक नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्यावर एका १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर आरोप आहे. या प्रकरणी अनुराधापुरा न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. अटक टाळण्यासाठी हेमरत्न कोलंबो येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते, जिथून पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drug Cartels : ट्रम्पचा ‘किलर’ प्लॅन! पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांच्या संशयित बोटीवर हल्ला; 2 जण ठार, एकाचा शोध सुरू
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी पीडित मुलीच्या आईलाही अटक केली आहे. तपासात असे समोर आले आहे की, मुलीच्या आईनेच या गुन्ह्यात मुख्य पुजाऱ्याला मदत केली होती. हे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी केवळ एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिला डांबून ठेवल्याच्या तक्रारीवरून सुरू झाले होते. मात्र, पोलीस तपासात यामागील लैंगिक शोषणाचे काळे वास्तव उघड झाले. १५ वर्षीय पीडितेने दिलेल्या जबाबामुळे या हाय-प्रोफाईल प्रकरणाला वाचा फुटली आहे.
Police have launched steps to arrest the Anuradhapura Atamasthanadhipathi, Venerable Pallegama Hemarathana Thera, over allegations linked to the sexual abuse of a 15-year-old girl, according to a statement issued by the Police Media Division. In a statement issued today, Police… pic.twitter.com/GcfBRQsaDb — NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) May 8, 2026
credit – social media and Twitter
हे प्रकरण ताजे असतानाच, श्रीलंकेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. २८ एप्रिल २०२६ रोजी कोलंबो विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली. थायलंडहून परतणाऱ्या २२ बौद्ध भिक्षूंना ११० किलोग्रॅमपेक्षा जास्त गांजासह रंगेहात पकडण्यात आले. या भिक्षूंनी त्यांच्या सुटकेसमध्ये खास कप्पे (False bottoms) तयार करून अत्यंत हुशारीने हा गांजा लपवला होता. प्रत्येक भिक्षूकडे किमान ५ किलो गांजा सापडला. जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ३.४५ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १.१ अब्ज श्रीलंकन रुपये) इतकी प्रचंड आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Space Mystery: पेंटागॉनचा ‘पँडोरा बॉक्स’! Aliens आणि UFO फाईल्समधील ‘त्या’ 161 कागदपत्रांनी जग हादरले; काय आहे चंद्रावरील रहस्य?
श्रीलंकेत बौद्ध धर्माला सर्वोच्च स्थान आहे आणि तिथले भिक्षू समाजाचे मार्गदर्शक मानले जातात. मात्र, एका बाजूला ७१ वर्षीय पुजाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला २२ तरुण भिक्षूंचा अंमली पदार्थांच्या तस्करीतील सहभाग, यामुळे श्रीलंकन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रवक्ते एफ. टी. वूटलर यांनी सांगितले की, दोन्ही प्रकरणांमध्ये सखोल तपास सुरू असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अनुराधापुरा येथील मंदिराच्या आवारातच हे अत्याचार घडल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या दोन्ही घटनांनी श्रीलंकेतील कायदे आणि सुव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे केले असून, धार्मिक स्थळांमधील सुरक्षेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Ans: अनुराधापुरा येथील 'अतमस्थान' धार्मिक स्थळाचे मुख्य पुजारी ७१ वर्षीय पल्लेगामा हेमरत्न यांना अटक करण्यात आली आहे.
Ans: २२ भिक्षूंनी थायलंडहून परतताना त्यांच्या सुटकेसमध्ये खास कप्पे तयार करून ११० किलो गांजा लपवून आणला होता.
Ans: पीडित मुलीच्या आईवर मुख्य पुजाऱ्याला लैंगिक अत्याचारात मदत केल्याचा आणि मुलीला धोक्यात टाकल्याचा आरोप आहे.