Stop supporting terrorists Trump's threat to Iran after attack on Houthis
वॉशिंग्टन: अमेरिकेन सैन्याने शनिवारी रात्री येमेनच्या हुथी बंडखोरांवर मोठा हवाई हल्ला केला. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांनी इराणशी त्यांच्या अणुप्रकल्पावर तडजोड करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव इराण समर्थित गटाविरुद्धच्या मोठ्या मोहिमीची सुरुवात होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवस हल्ले सुरुच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हुथी बंडखोर हा इराण समर्थित गट आहे. यामुळे या दहशतवादी गटाला पाठिंबा देणे थांबवावे असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या हवाई आणि नैदलाच्या हल्ल्यांमध्ये हुथींच्या रडार, हवाई संरक्षण, क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ हुथींना धडा शिकवणे नसून इराणला एक महत्वपूर्ण संदेश ट्रम्प यांनी दिला आहे. इराणच्या अणुप्रकल्पांबाबत अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न ट्रम्प करत असल्याचे म्हटले जात आहे.
इराणसाठी वाढता धोका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील निर्बंध आणि लष्करी धमक्यानंतरही इराणने अणुकार्यक्रमांबाबत वाटाघाटी करण्यास नकार दिल आहे. मात्र, अमेरिकेचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेतू इराणची प्रादेशिक प्रॉक्स चालवण्याची क्षमता कमकुवत करण्याचा आहे. त्यांनी इराणला संदेश दिला आहे की, हुथींना पाठिंबा न थांबवल्यास लष्करी कारवाई करण्यात येईल. मात्र अमेरिकेचा दबाव वाढत असूनही अद्याप इराणने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हुथींसोबत अमेरिकेचा इराणला संदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी हुथींसोबतच इराणलाही संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणे तातडीने थांबवा! अमेरिका किंवा जगभरातील शिपिंग लेनला धोका देऊ नका, असे न केल्यास सावधगिरी बाळगा. तुमच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात येईल आणि यासाठी तुम्ही स्वत: जबाबदार असाल. अमेरिका कोणताही दयाळूपण दाखवणार नाही.
दहशतवादविरोधी अमेरिका आणि रशियाची दिल्लीत बैठक होणार
हशतवादाचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि रशिया एकत्र येत असून, भारतात लवकरच या विषयावर व्यापक रणनीती ठरवली जाणार आहे. 19 ते 20 मार्च दरम्यान दिल्लीत ASEAN देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे, जिथे दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. या बैठकीत तंत्रज्ञानाच्या मदतीने झपाट्याने बदलत असलेल्या दहशतवादाच्या स्वरूपावर विचार करून, त्याविरोधात ठोस रणनीती आखली जाणार आहे.