Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Syria News :  सीरियाची प्रसिद्ध गायिका असाला नसरी हिने 16 वर्षांनंतर दमास्कसच्या मंचावर पुनरागमन केले. अल-फय्हा स्पोर्ट्स हॉलमध्ये झालेल्या कॉन्सर्टला हजारो चाहत्यांची उपस्थिती होती. 2011 नंतरच्या राजकीय भूमिकेमुळे ती अनेक वर्षे सीरियाबाहेर राहिली होती. नव्या ‘The Syrian Album’मधील गाणी सादर करत असालाने मायभूमीत प्रवेश केला .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 19, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मंचावर येताच चाहत्यांचा जल्लोष
  • 2011 नंतर सीरियापासून दूर
  • ‘मायभूमीत गाण्याचे स्वप्न पूर्ण झाले’
Syria News : सीरियाची प्रसिद्ध गायिका असाला नसरी हिने तब्बल 16 वर्षांनंतर दमास्कसच्या मंचावर दिमाखदार पुनरागमन केले आहे. 17 सप्टेंबर रोजी अल-फय्हा स्पोर्ट्स हॉलमध्ये झालेल्या तिच्या कॉन्सर्टला मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. 2010 मध्ये दमास्कस ऑपेरा हाऊसमध्ये कार्यक्रम केल्यानंतर सीरियातील हा तिचा पहिलाच अधिकृत स्टेज शो ठरला.

तब्बल दीड दशकाहून अधिक काळ देशापासून दूर राहिल्यानंतर असालाचे मायभूमीत परतणे हा तिच्या चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरला.

मंचावर येताच चाहत्यांचा जल्लोष

‘The Return of Assala’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सीरियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा पाठिंबा होता. असाला मंचावर येताच चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘Syria Janna’ या गाण्याने झाली. त्यानंतर तिने आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या संगीत कारकिर्दीतील लोकप्रिय गाणी सादर केली.

असालाच्या नव्या ‘The Syrian Album’ मधील गाण्यांनाही कार्यक्रमात स्थान मिळाले. या अल्बममध्ये सीरियातील 14 प्रांतांच्या संगीत परंपरांपासून प्रेरणा घेतलेली गाणी आहेत. त्यामुळे तिच्या पुनरागमनाच्या कार्यक्रमाला संगीतासोबतच सीरियन सांस्कृतिक वारशाचीही जोड मिळाली.

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

2011 नंतर सीरियापासून दूर

2011 मध्ये सीरियात सरकारविरोधी उठाव सुरू झाल्यानंतर असालाने उघडपणे आंदोलकांना पाठिंबा दिला होता. तत्कालीन बशर अल-असद सरकारच्या भूमिकेवर तिने टीका केली. त्यानंतर ती सीरियाबाहेर राहिली आणि तिच्यावर सीरियन आर्टिस्ट्स सिंडिकेटमधून कारवाई करण्यात आली.

असालाने अनेक वर्षे परदेशात राहूनही आपल्या संगीतामधून सीरियाशी असलेले नाते कायम ठेवले. तिच्या नव्या अल्बममध्येही देशातील विविध भागांच्या लोकसंगीताचा समावेश करण्यात आला आहे.

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

‘मायभूमीत गाण्याचे स्वप्न पूर्ण झाले’

दमास्कसच्या मंचावर परतल्यानंतर असाला भावूक झाली. आपल्या देशात पुन्हा गाण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहत असल्याचे तिने चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले. तिच्या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती होती आणि कार्यक्रम मध्यरात्रीनंतरही सुरू राहिला.

असालाच्या पुनरागमनाकडे सीरियाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे. तिच्या कार्यक्रमामुळे दमास्कसच्या संगीतविश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ काळानंतर मायभूमीच्या मंचावर परतलेल्या या लोकप्रिय गायिकेच्या कार्यक्रमाने चाहत्यांना तिच्या जुन्या आठवणी पुन्हा जागवल्या.

 

Web Title: Syria news assala celebrates in damascus after 16 years syrian stage comes alive again with a housefull concert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Syria
  • syria news
  • World news

संबंधित बातम्या

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती
1

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती

Breaking News : भारतासाठी खुशखबर; इराणने भारतासाठी होर्मूझ केला खुला
2

Breaking News : भारतासाठी खुशखबर; इराणने भारतासाठी होर्मूझ केला खुला

US News : इराण युद्धाचा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला फटका! मध्यावधी निवडणुकीतील पराभवावर राष्ट्राध्यक्षांची कबुली
3

US News : इराण युद्धाचा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला फटका! मध्यावधी निवडणुकीतील पराभवावर राष्ट्राध्यक्षांची कबुली

Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात
4

Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.