Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरियाच्या नवीन राष्ट्रपतींचा आखाती देशांचा दौरा सुरु; ‘या’ राष्ट्राला दिली पहिली भेट

बशर-अल असदच्या पदाभार संभाळताच अनेक अरब राष्ट्रांनी राजधानी दमास्कसला भेट दिली आहे. आता सीरियाचे नवे अंतरिम राष्ट्रपती अल-जुलानी यांनी आखाती देशांना भेट देण्यास सुरुवात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2025 | 05:44 PM
Syria's interim President visited Saudi Arabia first foreign visit

Syria's interim President visited Saudi Arabia first foreign visit

Follow Us
Close
Follow Us:

दमास्कस: गेल्या वर्षी 2024 मध्ये बंडखोर गट अल-शाम तहरीरने दहशतवादी हल्ले केले आणि सीरियातील असदची सत्ता संपुष्टात आणली. सध्या सीरियाचे नेतृत्व अल-शाम तहरीर गटाचे प्रमुख अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली असून मोहम्मद अल-जुलानी यांनी राजधानी दमास्कसमध्ये संविधान रद्द करून स्वतःला राष्ट्रपती घोषित केले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

सीरियाच्या नवीन राष्ट्रपतींचा आखाती देशांचा दौरा सुरु

बशर-अल असदच्या पदाभार संभाळताच अनेक अरब राष्ट्रांनी राजधानी दमास्कसला भेट दिली आहे. आता सीरियाचे नवे अंतरिम राष्ट्रपती अल-जुलानी यांनी आखाती देशांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी या दौऱ्यात सौदी अरेबियाची राजधानी रियाधला भेट दिली आहे. सीरियाचा सौदी अरेबियाचा पहिला दौरा दमास्कच्या प्रादेशिक मित्रापासून इराणपासून दूर नेत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. असद सरकारच्या सत्तेत इराणचा सीरियावर खोलवर असलेला प्रभाव आता संपुष्टात येत असल्याचे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- US-Mexico Trade War: ट्रम्पच्या टॅरिफवर मेक्सिकोच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया म्हणाल्या; ‘आम्हाला संघर्ष नको होता, पण…

अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षीच्या अखेरच्या महिन्यात हयात-तहरीर अल-शामच्या विद्रोही गटाने हल्ला केला आणि असदची सत्ता नष्ट केली. एकेकाळी हा विद्रोही गट अल-कायदाशी जोडलेला होता, मात्र आता तो एक उदारमतवादी संघटना म्हणून जगापुढे सादर होत आहे.

सीरियाच्या सौदी अरेबियाकडून अपेक्षा

अरब प्रदेशातील सर्वात शक्तिशाली देशा म्हणून सौदी अरेबियाला ओळखले जाते. यामुळे सौदी अरेबिया सीरियाला संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारची मदत करु शकतो. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी जानेवारीत दमास्कसला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी, रियाध सीरियावरील निर्बंध उठवण्यासाठी “सक्रियपणे वाटाघाटी” करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यामुळे सौदी अरेबियाचे निर्बंध उठल्याने सीरियाचे संबंध अधिक बळकट होण्यास मदत होऊ शकते.

तख्तापलट कसा घडला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये सीरियाचे गृहयुद्ध थांबल्यानंतर, जुलानी आपल्या लढाऊ शक्तीला मजबूत करण्यासाठी लागले. इस्त्रायल-हमास आणि रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी त्यांना योग्य संधी मिळाली. रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असताना त्याने सीरियातून आपले सैन्य काढून घेतले. तर 2023 मधील इस्त्रायल-हमास युद्धामुळे, इराण आणि हिजबुल्लाह सैन्य देखील सीरियातून हटवण्यात आले.

या संधीचा फायदा घेत, जुलानी यांनी सीरियन सैन्यावर हल्ला करून 11 दिवसांत राष्ट्रपतींचा सत्तापालट केला. सीरियातील या सत्तापालटामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. आता अल जुलानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार कसे कार्य करेल आणि सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडमध्ये! सत्ता हाती घेताच बेकायदेशीर भारतीयांवर उगारला कारवाईचा बडगा

Web Title: Syrias interim president visited saudi arabia first foreign visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

भारत, अमेरिका की जपान…; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर 
1

भारत, अमेरिका की जपान…; चीनच्या लष्करातील नव्या आधुनिक शस्त्रांचा धोका सर्वाधिक कोणाला? जाणून घ्या सविस्तर 

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…
2

भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले…

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral
3

क्षणात नष्ट झालं सगळं! पाकिस्तानाच्या महाभयंकर पुरात अवघं कुटुंब गेलं वाहून; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद
4

सौदी अरेबियाचा भारताला धक्का! ‘या’ मोठ्या तेल उत्पादक कंपनीला कच्चा तेलाचा पुरवठा केला बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.