File Photo : Talc Powder
न्यूयॉर्क : आपल्यापैकी अनेकजण टॅल्कम पावडरचा वापर करत असतील. या पावडरच्या वापराने चेहऱ्यावर काही वेळासाठी ग्लो येत असला तरी ही पावडर तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कारण, टॅल्कम पावडरच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचा दावाच जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्लूएचओ’ने केला आहे. याबाबतचा अहवालही जारी करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्च’ने टॅल्कम पावडरच्या संदर्भातील तपासणी अहवाल सादर केला आहे. यामध्ये पावडरच्या जास्त वापरामुळे मानवांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. एजन्सीकडे याचा पुरावादेखील आहे. कारण त्याचा संबंध उदरामध्ये होणाऱ्या कर्करोगाशी आहे. संशोधनात असे म्हटले आहे की, बहुतेक लोक दररोज टॅल्कचा वापर बेबी पावडर किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या स्वरूपात करतात. पण हा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
बेबी पावडरमध्ये अधिक धोका
टॅल्क अधिकतर निसर्गाद्वारे सहज उपलब्ध होतात. हे एक खनिज आहे, जे जगभरात उत्खनन केले जाते. हे बऱ्याचदा बेबी पावडर तयार करण्यासाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत पावडरचा अतिवापर केल्याने मुलांसाठीही धोका वाढतो.