भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी बदलापूर दौऱ्यात बोलताना, बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. मतदानाबाबत लोकांच्या मनात काय आहे हे स्पष्ट सांगता येत नसले, तरी बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलापूर रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय लवकरच घेतले जाणार असून, आगामी अधिवेशनात बदलापूरच्या रेल्वे व स्थानिक समस्या प्राधान्याने मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.