लातूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उदगीर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पद भाजपला देत राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती करण्यात आली आहे.यासाठी आज उदगीर नगरपरिषदेच्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडलीय… यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे तर उदगीरकरांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.उदगीर शहराच्या विकासासाठी युतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे.