
Tejas Fighter Jet Crash
Tejas Fighter Jet Crash News in Marathi : नवी दिल्ली : अलीकडेच दुबई एअर शोदरम्यान भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान तेजसचा भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात विमानातील पायलटचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. तेजसने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच याचा अपघात घडला होता. यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने खिल्ली उडवली आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यावर भारतीयांना तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Indian Tejas fighter jet crashed: दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) स्थानिक वेळेनुसार, दुपारी २.१० वाजता विमानाचा अपघात घडला होता. विमानाने भरारी घेतली आणि काही सेकंदातच ते खाली कोसळले होते. यानंतर प्रचंड आग लागली होती. या अपघाताचा एका पाकिस्तानी पत्रकाराने व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडिओमुळे भारतीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
व्हिडिओ बनवताना पाकिस्तानी पत्रकाराने खिदळत असंवेदनशील टिप्पीणी अपघातावर केली आहे. यामुळे भारतीयांना त्याला चांगलीच चपराक दिली आहे. व्हिडिओ बनवताना पत्रकाराने, अल्लाहच्या आशीर्वादाने विमान पडले, आम्ही शहीद होण्यापासून वाचलो अशी टिप्पणी केली आहे. या व्हिडिओचे चित्रीकरण करत रिपोर्टींग करताना पत्रकार हसत आहेत. सध्या भारतीयांनी यावर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित पत्रकाराला भारताचा अपमान करण्याबद्दल कठोर शिक्षा व्हावी असे म्हटले जात आहे.
SHAMEFUL 🚨 A Pakistani journalist filmed the crash while laughing 😠 Terrorist Osama bin Laden was found in Pakistan only.pic.twitter.com/fpF2wrPiVR https://t.co/7Au6oTnNra — News Algebra (@NewsAlgebraIND) November 21, 2025
सध्या या अपघाताची चौकशी सुरु आहे. याच वेळी भारतीय हवाई दलाच्या समुदायाने वैमानिकाच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात वैमानिकाच्या मृत्यूवर पाकिस्तानी पत्रकार खिदळत आहे. यामुळे त्याच्या या कृत्याचा तीव्र निषेध सोशल मीडियावर केला जात आहे. ही कृती अमानवीय आणि भारताचा अपमान करणारी असल्याचे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Ans: तेजस विमान अपघातावर पाकिस्तानी पत्रकाराने खिदळत याचे रिपोर्टिंग केले आहे. तसेच वैमानिकाच्या मृत्यूप्रती असंवेदनशीलता दाखवत शहीद होण्यापासून वाचलो असे म्हटले आहे.
Ans: तेजस विमान अपघातवर असंवेदनशील व्हिडिओ बनवणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारावर कारवाईची मागणी भारतीयांकडूने केली जात आहे. त्याच्या कृत्याचा तीव्र निषेध होत असून ही कृती अमानवीय आणि भारताचा अपमान करणारी असल्याचे लोकांनी म्हटले आहे.