Tejas fighter jet engine delivery to take place by the end of this March
नवी दिल्ली: भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. तेज फायटर जेटच्या इंजिनची लवकरच डिलिव्हरी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, GE-404 इंजिनची डिलिव्हरी मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक(GE) कंपनीने ही माहिती दिली आहे.दोन वर्षाहून अधिक काळ उशिर झाल्यामुळे भारतीय वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता HAL ला तेजस फायटर जेटचे पहिले इंजनी लवकर मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तेजस फायटर जेटच्या इंजिनसाठी करार करण्यात आला होता. या करारांतर्गत 2025 मध्ये एकूण 12 इंजिने भारतात मिळणार आहेत. तर उर्वरित इंजनी डिलिव्हरी दरवर्षी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या इंजिनची डिलव्हरी मार्च महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे. HAL ने GE सोबत 2021 मध्ये 716 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. या कारारांतर्गत 2023 पासून डिलिव्हरी सुरु होणार होती, पण काही अडचणीमुळे लांबणीवर पडली.
सध्या भारत स्वदेशी फायटर जेट इंजिन निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (iCET) या भारत-अमेरिका करारांतर्गत GE-414 इंंजिनचे तंत्रज्ञान भारतातत तयार करण्यासाठी HAL आणि GE एकत्र येउन काम करत आहे. तेजस फायटर जेट साठी शक्तिशाली इंजिन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) अंतर्गत विकसित ॲडव्हॉन्स्ड मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) या फायटर जेटला सामर्थ देणार आहे.
भारतीय वायु सेवेकडून HAL ला 38 MK -1A फायटर जेट्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, इंजिनांच्या विलंबामुळे यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल एपी सिंह यांनी निराशा व्यक्त केली आहे.तसेच संरक्षण सचिव आर. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे.
पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांसाठी व्यवसाय मॉडेल तयार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. भारताची योजना भविष्यात अधिक स्वावलंबी होण्याची आहे. AMCA प्रकल्पाच्या माध्यमातून देशीकरणाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतीय लढाऊ विमान उत्पादन क्षेत्राला नवसंजीवनी मिळावी यासाठी HAL आणि DRDO जोमाने काम करत आहेत.