तेजस फायटर जेटवरुन अमेरिकेची भारतासोबत मोठी खेळी; केली 'ही' मोठी मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेला AF-16 लढाऊ विमान भारताला विकण्यात यश मिळाले नाही. यानंतर भारताने अमेरिकेसोबत संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी देशाचे स्वदेशी तेजस लढाऊ विमानासाठी GE-414 इंजिनची मागणी केली होती. यासाठी करार करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेची GE कंपनीने इंजिनचा पुरवठ्यात उशीर करत आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, त्यांनी सुटे भाग मिळण्यास उडचण येत आहे. यामुळे भारताला लढाऊ विानांचे नियोजन करण्यात अडथळे येते आहेत.
भारताच्या तेजस विमान प्रकल्पात विलंब
आता GE कंपनीने आणखी 50 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली असून भारतासमोर नवा अडथळा उभा केला आहे. GE एव्हिएशन कंपनीने इंजिनसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या सुट्या भागांची कमतरता असल्याचा दावा केला आहे. यामुळे तेजस विमान प्रकल्पात विलंब होत आहे. तेजस मार्क 1A आणि मार्क 2 या 4.5 पिढीच्या विमानांसाठी GE-414 इंजिन महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. या विलंबामुळे भारताच्या संरक्षण प्रकल्पांवर विपरित परिणाम होऊ शकतो, विशेषतः जेव्हा पाकिस्तान आणि चीन पाचव्या पिढीचे लढाऊ विमान विकसित करत आहेत.
समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताचा अमेरिका दौरा
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या अधिकाऱ्यांचा एक प्रतिनिधी कमिटी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा GE-414 इंजिनच्या कराराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केला जात आहे. भारताने याआधी 99 GE-414 इंजिन खरेदीसाठी करार केला होता, मात्र, यामध्ये इंजिन्सची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे इंजिन भारताच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठीही निवडण्यात आले आहे.
GE एव्हिएशनच्या अधिक निधीच्या मागणीमुळए हा करार आता 1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. HAL ने GE अतिरिक्त दस्तऐवज मागवले आहेत. याद्वारे कंपनीच्या प्रस्ताव पुन्हा एकदा सखोल तपासता येईल. मात्र, जर GE-414 इंजिनच्या पुरवठ्यात आणखी विलंब झाला, तर तेजस मार्क 2 प्रकल्प लांबणीवर जाऊ शकतो. हे विमान मिराज 2000, जगुआर आणि मिग 29 या विमानांच्या जागी तैनात करण्यात येणार आहे.
भारतासमोर संरक्षण योजनांमध्ये मोठी आव्हाने
भारतीय संरक्षण तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, GE-414 इंजिनची तंत्रज्ञान हस्तांतरण भारताला मोठा फायदा देऊ शकते. सध्या अमेरिकेच्या इंजिनच्या लांबणीमुळे भारतासमोर संरक्षण योजनांमध्ये मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. भारतासाठी या प्रकरणावर लवकरात लवकर उपाय काढणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा देशाला त्याच्या लढाऊ विमान क्षमतेसाठी इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.