वॉशिंग्टन: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सरकारने मार्गदर्शत तत्वे जारी केले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांना अमेरिकन कायद्यांचे पालन करण्यास सांगितले आहे. सध्या अमेरिकेन ट्रम्प प्रशान अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचा निषेध करणाऱ्या आणि हमासला समर्थन देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहे. यापूर्वी एका भारतीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे, तसेच एक विद्यार्थीना व्हिसा रद्द करण्यात आला, हे लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी हमास समर्थनार्थ प्रचार आणि इस्त्रायलला विरोध करणाऱ्या भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती, शिवाय रंजनी श्रीनिवास या भारतीय विद्यार्थीनीचा पॅलेस्टिनी रॅलीमध्ये सहभागी झाल्याने व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यानंतर रंजनीने स्वत:हून अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, अमेरिकेन आम्हाला सुरीच्या अटकेची माहिती दिली नाही आणि सुरीने देखील आमच्याशी संपर्क साधला नाही. आम्हाला त्याच्या अटकेची माहिती माध्यमांकडून मिळाली. तसेच रंजनी श्रीनिवास देखील अमेरिका सोडून कॅनडामध्ये गेली असल्याची माहिती आहे.
अमेरिकेत सध्या भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारत सरकार अमेरिकेशी चर्चा करुन शैक्षणिक संबंध देखील मजबूत करत असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन करुन नये, तसेच कोणतीही समस्या आल्यास भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असे जयस्वाल यांनी सांगितले.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातील बदर खान सुरीला व्हर्जिनियातून अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अटक केली होता. सुरी ने हमासच्या समर्थनार्थ प्रचार केल्याचा आणि दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. सुरी हा अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेत होता. मुस्लिम-ख्रिश्चन अंडरस्टॅंडिग येथे पोस्टडॉक्टरला फेलो म्हणून शिक्षण घेत होता.
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाचे सहाय्यक सिचव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी, आरोप केला आहे की, सुरी हमासला सतत पाठिंबा देत होता. त्याने सोशल मीडियावर यहूदीविरोधी भावनांना प्रोत्साहन दिले. यामुळे त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात येणार होते. तथापि, अमेरिकेच्या न्यायालयाने सुरीच्या हद्दपारीला स्थगिती दिली आहे. व्हर्जिनिया न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आदेश दिला की जोपर्यंत न्यायालय या संदर्भात आदेश देत नाही तोपर्यंत सुरीला अमेरिकेतून हद्दपार केले जाणार नाही.