दोन दिवसापुर्वी मास्कोमध्ये दहशतवादी (Moscow Terrorist Attack) हल्ला झाला. या हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी एका कॅान्सर्टमध्ये लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेचा जगभरातून संताप व्यक्त होत असताना आता पाकिस्तातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack On Pakistan) करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केले.
[read_also content=”तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियास बोई सोबत अडकली विवाहबंधनात, उदयपूरमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/taapsee-pannu-tie-a-knot-with-boyfriend-mathias-boe-in-udaipur-nrps-517802.html”]
पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन असलेल्या तुर्बत आणि पीएनएस सिद्दीकवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही सुविधांजवळ जोरदार गोळीबार आणि स्फोट झाल्याचे वृत्त आहे. द बलुचिस्तान पोस्टचा हवाला देत न्यूज एजन्सी एएनआयने म्हटले आहे की, तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या परिसरात अनेक स्फोटही झाल्याची माहिती आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तुर्बतच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली असून सर्व डॉक्टरांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या मजीद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला मजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या भागातील संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे अनेक लढाऊ एअरबेसमध्ये घुसले आहेत. या एअरबेसवर चिनी ड्रोनही तैनात आहेत.






