These countries against US president's Tarrifs know who oppesed
Tarrif News Marathi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या धोरणावरुन संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. अगदी सर्वात विश्वासू मित्र राष्ट्र भारतालाही त्यांनी सूट दिलेली नाही. या धोरणांतर्गत ट्रम्प यांनी त्यांच्या व्यापारी भागीदारांवर १० ते ५०% पर्यंत टॅरिफ लादले आहे. हे टॅरिफ ७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. भारतावर ट्रम्प यांनी २५ टक्के कर लादला आहे. शिवाय रशियाशी व्यापार बंद न केल्यामुळे हा कर अधिक वाढवण्याची धमकीही दिली आहे.
भारताने याला तीव्र विरोध केला आहे. यावर भारताने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भारतासोबत आणखी काही देश आहे, ज्या देशांनी ट्रम्प प्रशानाच्या टॅरिफ धोरणाला तीव्र विरोध केला आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आज आपण या देशांबद्दल जाणून घेणार आहोत.
भारत देईना डोनाल्ड ट्रम्प यांना भाव! एकीकडे धमकी सत्र सुरु असताना अधिकाऱ्यांची रशिया वारी
भारत
ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला आहे. सध्या त्यांनी हा कर वाढवण्याची धमकी दिली आहे. रशियाशी सुरु असलेला तेल व्यापार थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. परंतु भारताने याला विरोध केला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक देशाला त्याचे राष्ट्रीय आणि आर्थिक हित साधण्याचा अधिकार आहे, यामुळे भारत यासाठी आवश्यक ती पावले उचलत राहिल. शिवाय अमेरिका स्वत:हा रशियाकडून खते आयात करतो, यामुळे त्यांनी भारताला सल्ला देऊ नये.
रशिया
याच वेळी रशियाने देखील भारताला समर्थन दिले आहे. रशियाने भारतविरोधी विधानांना त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी धोक्याचे मानले आहे. तसेच त्यांच्या भारतासारख्या मित्र देशांना धमकवण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही देशाला नसल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे. सध्या रशिया आणि अमरेकितही युक्रेन युद्धावरुन तीव्र वाद सुरु आहे.
ब्राझील
ट्रम्प यांनी सर्वाधिक कर ब्राझीलवर लादला आहे. ब्राझीलवर ट्रम्पने ५०% कर लागू केला असून याला तीव्र विरोध केला आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेपुढे झुकण्यास नकार दिला आहे. ब्राझीलने जागतिक व्यापार संघटनेशी संपर्क साधण्याचा विचार केला आहे. ब्राझीलने अमेरिकेचा थेट दबाव झुडकारत WTO कडे धाव घेतली आहे. ट्रम्प यांनी ब्राझीलला वाटाघाटीसाठी चर्चेची ऑफर दिली आहे, परंतु लुला दा सिल्वा यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी यावर आधी भारताशी आणि चीनशी चर्चा करण्याचे म्हटले आहे.
चीन आणि कॅनडा
ट्रम्प यांनी सुरुवातील चीनवर १२५% टक्के कर लागू केला होती, जो पुढे टॅरिफ युद्धादरम्यान १४५% पर्यंत पोहोचला. तसेच चीनने देखील अमेरिकेवर तितकाच कर लादला होता. परंतु सध्या चीनला यातून सूट देण्यात आली असून केवळ १० %कर लागू करण्यात आला आहे. कॅनडावर ३५% कर लागू केला आहे. परंतु US-Canasa-Mexico करारामुळे कॅनडाच्या बहुतेक उत्पादनांवरील वस्तूंना सूट देण्यात आली आहे. या दोन्ही देशांनी सुरुवातील ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला विरोध केला होता, परंतु सध्या त्यांना कारतून थोडीशी सवलत मिळाली आहे.
युरोपियन युनियन
याच वेळी ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर १५% कर लागू केला आहे. वाटाघाटी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र युरोपियन देशांनी याला विरोध केलेला नाही.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे टॅरिफ धोरण हे अमेरिकेला मजबूत बनवण्यासाठी आहे. अमेरिकेवर जास्त कर लादणाऱ्या देशांवर तितकाच कर लादला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग