डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump News Marathi : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला रशियाशी व्यापार थांबवण्यास सांगितला आहे, यावर भारताने पलटवार करत अमेरिका स्वत:हा रशियाशी व्यापार करत असताना त्याने भारताला सल्ला देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्पच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. अमेरिका रशियाशी (Russia) व्यापार करतो यावर त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले, यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भारताच्या म्हणण्यानुसार, अमेरिका (America) रशियाकडून युरेनियम आणि इतर खते आयात करतो. दरम्यान यावर ट्रम्प यांना प्रश्न विचारला असता त्यांची भंबेरी उडाली आहे. ट्रम्प यांना रिपब्लकन नेत्या निक्की हेली यांनी ट्रम्प यांना भारताशी संबंध न बिघडवण्याचा सल्लाही दिला आहे.
ट्रम्प यांना भारताच्या उत्तरावर विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अमेरिका रशियाकडून किती आणि कशाचा व्यापार करतो याची माहिती नसल्याचे म्हटले. याची चौकशी त्यांना करावी लागले असे ट्रम्प यांनी सांगितले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक दिवस आधी ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत मिळत आहे. तसेच भारत हे तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या नफ्यासह विकत आहे. यावर भारताने देखील चोख उत्तर दिले होते. भारताने स्पष्ट केले होते की, अमेरिकेचे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, भारताचे रशियाशी (Russia) व्यापार संबंध केवळ स्वतंत्र आणि राष्ट्रीय हिताचे आहेत.
तसेच त्यांनी सांगितले की, अमेरिका रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि इतर खते आयात करते. यामुळे अमेरिकेची भारतावरील टीका अयोग्य आहे. शिवाय पूर्वी ट्रम्प यांनी स्वत:हा भारताला जागतिक बाजारपेठांमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यास सांगितले होते. यामुळे भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी स्वतंत्र पावले उचलत राहिले असे स्पष्ट करण्यात आले.
याच वेळी अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प यांच्या विधानाविर तीव्र टीका केली आहे. हेली यांनी ट्रम्प यांच्या भारतावर अशा विधानांमुळे अमेरिका-भारत संबंध बिघडू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. याच वेळी दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनला करातून सूट दिली आहे. यावर हेली यांनी शत्रू देशांना सवलती न देता भारतासारख्या मित्राशी संबंध बनवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या दुतोंडी धोरणांवरही टीका केली आहे.
India should not be buying oil from Russia. But China, an adversary and the number one buyer of Russian and Iranian oil, got a 90-day tariff pause. Don’t give China a pass and burn a relationship with a strong ally like India.
— Nikki Haley (@NikkiHaley) August 5, 2025
भारत देईना डोनाल्ड ट्रम्प यांना भाव! एकीकडे धमकी सत्र सुरु असताना अधिकाऱ्यांची रशिया वारी