Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump प्रशासनात मोठा भूकंप! “इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध…”, अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा

अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांनी इराण युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. इस्रायलच्या दबावामुळे अमेरिकेने हे युद्ध सुरू केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 18, 2026 | 08:22 AM
अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा (Photo Credit- X)

अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • Donal Trump प्रशासनात मोठा भूकंप!
  • “इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध…”,
  • अमेरिकन टॉप ऑफिसर यांचा खळबळजनक राजीनामा
Joe Kent Resignation Trump Iran War: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटलेला असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांना प्रशासनांतर्गत मोठ्या बंडाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी विभागाचे (NCTC) सर्वोच्च अधिकारी जो केंट यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “इराणपासून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नसताना केवळ इस्रायलच्या दबावाखाली हे युद्ध सुरू करण्यात आले आहे,” असा गंभीर आरोप करत केंट यांनी ट्रम्प यांच्या युद्धनीतीला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

“माझा विवेक या युद्धाला परवानगी देत नाही”

जो केंट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लिहिलेले राजीनामा पत्र अत्यंत जहाल आहे. केंट यांनी म्हटले आहे की, “इराणमध्ये सुरू असलेले युद्ध हे अमेरिकेच्या हितासाठी नाही. इस्रायल आणि अमेरिकेतील त्यांच्या शक्तिशाली समर्थकांच्या दबावामुळे प्रशासनाने हा चुकीचा निर्णय घेतला आहे. माझी अंतरात्मा या युद्धाचे समर्थन करण्यास मला परवानगी देत नाही, म्हणूनच मी नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटरच्या संचालक पदाचा त्याग करत आहे.”

After much reflection, I have decided to resign from my position as Director of the National Counterterrorism Center, effective today. I cannot in good conscience support the ongoing war in Iran. Iran posed no imminent threat to our nation, and it is clear that we started this… pic.twitter.com/prtu86DpEr — Joe Kent (@joekent16jan19) March 17, 2026

ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला घरचा आहेर

केंट यांनी पत्रात ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळातील धोरणांचे कौतुक केले, मात्र सध्याच्या भूमिकेवर कडक टीका केली. ते म्हणाले, “2016 ते 2024 पर्यंत आपण ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचे पालन केले. मध्यपूर्वेतील युद्धे हा एक असा सापळा आहे ज्यात अमेरिकन सैनिकांचा जीव जातो आणि देशाची संपत्ती नष्ट होते, हे तुम्हालाही मान्य होते. मात्र, आता इस्रायलमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि अमेरिकन मीडियातील प्रभावशाली गटांनी दिशाभूल करणारी मोहीम राबवून तुम्हाला युद्धाच्या खाईत लोटले आहे.”

इस्रायलच्या रणनीतीवर गंभीर आरोप

जो केंट यांनी थेट आरोप केला की, “इराण अमेरिकेसाठी धोका आहे, हे सांगण्यासाठी जो प्रचार केला गेला तो पूर्णपणे खोटा होता. ही तीच रणनीती आहे जी इस्रायलने इराक युद्धाच्या वेळी वापरली होती, ज्यामध्ये अमेरिकेच्या हजारो वीर पुत्रांना आपला जीव गमवावा लागला. आपण पुन्हा तीच चूक करू शकत नाही. इराणवर हल्ला केल्यास त्वरित विजय मिळेल हा दावा एक मोठा खोटा बनाव आहे.”

“पुढील पिढीचा बळी नको”

आपल्या पत्रात केंट यांनी अत्यंत भावनिक आवाहनही केले आहे. एक माजी सैनिक म्हणून 11 वेळा प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम केलेल्या केंट यांनी सांगितले की, “इस्रायलने रचलेल्या अशाच एका युद्धात मी माझी प्रिय पत्नी शॅनन केंट हिला गमावले आहे. मी त्या दुःखातून गेलो आहे. त्यामुळे अमेरिकन जनतेला कोणताही लाभ मिळणार नाही अशा युद्धासाठी मी पुढच्या पिढीला मृत्यूच्या दारात ढकलू शकत नाही.” साहसी पाऊल उचलण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांना या विनाशकारी मार्गावरून मागे फिरण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प प्रशासनातील एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकाऱ्याने युद्धाच्या काळातच राजीनामा दिल्याने आता अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Web Title: Trump admin crisis joe kent resigns israel iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.