Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले

Yemen Conflict : येमेनमध्ये हुथींची वाढती ताकद सौदी अरेबियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. एमबीएसने ट्रम्प यांच्याशी दोनदा बोलून हुथींवर अमेरिकेने हल्ला करावा अशी विनंती केली, परंतु ट्रम्प यांनी थेट हल्ला करण्यास नकार दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 11, 2026 | 03:06 PM
Saudi Crown Prince Mohammed bin Salman Trump call

Saudi Crown Prince Mohammed bin Salman Trump call

Follow Us
Follow Us:
  • एमबीएसचे ट्रम्प यांना थेट फोन
  • अमेरिकेचा थेट हल्ल्यास नकार
  • तांबड्या समुद्रातील व्यापार संकटात

मध्य आशियामध्ये (मिडल ईस्ट) लष्करी आणि राजकीय तणाव दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला आहे. येमेनमधील (Yemen Conflict) इरणसमर्थित हुथी बंडखोरांनी आपले वर्चस्व वाढवत मोक्याचे ‘मोचा’ (Mokha) शहर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे. हुथींच्या या आक्रमक कारवाईमुळे सौदी अरेबियाच्या समर्थनाने लढणारे येमेनी सैन्य माघार घेण्यास भाग पडले आहे. हुथी लढवय्ये वेगाने दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे सौदी अरेबियाच्या सुरक्षेला आणि थेट सीमेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या बिघडत्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी थेट वॉशिंग्टनशी संपर्क साधला. ॲक्सिऑस (Axios) या अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या विशेष अहवालानुसार, एमबीएस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच दिवसात दोनदा फोन केला. पहिल्या फोनमध्ये त्यांनी येमेनमधील ढासळत्या परिस्थितीची माहिती दिली आणि काही तासांनंतर पुन्हा फोन करून हुथी बंडखोरांवर अमेरिकेने थेट हवाई व क्षेपणास्त्र हल्ले करावेत, अशी जोरदार मागणी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट लष्करी कारवाईस नकार का?

एमबीएस यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या मागणीनंतरही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हुथींवर थेट लष्करी हल्ला करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाला सध्या या भागात दुसरी नवीन युद्ध आघाडी (Military Front) उघडायची नाही. अमेरिकेचे मुख्य प्राधान्य होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सुरक्षित ठेवणे आणि इराणच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करणे हे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

ट्रम्प यांनी थेट हवाई हल्ले करण्याचे टाळले असले तरी सौदी अरेबियाला संपूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले नाही. अमेरिकेने सौदी सैन्याला हुथींच्या ठिकाणांची गुप्त माहिती (Targeting and Intelligence Data) पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. याव्यतिरिक्त, सध्या सुमारे २०० अमेरिकन लष्करी जवान सौदी अरेबियामध्ये हजर असून ते थेट युद्धात न उतरता केवळ तांत्रिक आणि गुप्तचर मदत पुरवत आहेत.

बाब अल-मंदब सामुद्रधुनी आणि जागतिक तेलाचा पुरवठा

हुथी बंडखोरांनी मोचा शहर ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा पुढील रोख ‘बाब अल-मंदब सामुद्रधुनी’ (Bab el-Mandeb Strait) कडे आहे. हा सागरी मार्ग संपूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. जागतिक व्यापारातील जवळपास १२ टक्के सागरी वाहतूक याच अरुंद मार्गाने होते. याशिवाय, सौदी अरेबियाच्या कच्च्या तेलाची (Crude Oil) मोठी निर्यात याच सागरी मार्गावरून तांबड्या समुद्रात (Red Sea) केली जाते.

इराण आधीपासूनच होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांच्या वाहतुकीवर दबाव आणत आहे. अशा परिस्थितीत जर हुथींनी बाब अल-मंदबवर पूर्ण नियंत्रण मिळवले, तर इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या हातात जागतिक इंधन पुरवठा रोखण्याचे एक मोठे शस्त्र येईल. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या असून जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद

पाकिस्तान आणि तुर्कीचा पाठिंबा न मिळाल्याने सौदी एकटा?

यापूर्वी सौदी अरेबियाने आपल्या सुरक्षेसाठी प्रादेशिक मुस्लिम देशांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. मक्का करारांतर्गत सौदी अरेबियाने पाकिस्तान आणि तुर्कस्तानकडे लष्करी मदतीची मागणी केली होती, परंतु या दोन्ही देशांनी येमेनमधील या युद्धात थेट सैन्य पाठवण्यास किंवा हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मित्रराष्ट्रांनी पाठ फिरवल्यामुळेच सौदी अरेबियाला पुन्हा एकदा अमेरिकेचा उंबरा ओलांडवा लागला आहे.

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तातडीची चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे (CENTCOM) कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर गुरुवारी तातडीने सौदी अरेबियात दाखल झाले. त्यांनी सौदी लष्करी अधिकाऱ्यांशी बंद दाराआड महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. ट्रम्प प्रशासन थेट हल्ला करत नसले तरी सौदी अरेबियाची बचाव यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Web Title: Trump declines saudi mbs request for us strikes on yemen houthis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Houthi
  • Saudi Arabia
  • Saudi Crown Prince
  • World news

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच
1

BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
2

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
3

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

Saudi-Yemen Conflict : हुथी बंडखोरांचा सौदीला मोठा धक्का; मोचा शहरावर ताबा मिळवत बाब अल-मंदेबकडे कूच
4

Saudi-Yemen Conflict : हुथी बंडखोरांचा सौदीला मोठा धक्का; मोचा शहरावर ताबा मिळवत बाब अल-मंदेबकडे कूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.