आधी थप्पड मग मारली बाटली...; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan viral video : पाकिस्तानमधून सध्या एक धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. यामध्ये एका मुक्या प्राण्यासोबत क्रूर वर्तन करण्यात आले आहे. ही घटना पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १४ ऑगस्टला घडली आहे. यावेळी काही पाकिस्तानी तरुण स्वातंत्र्यदिन साजरा करत होते. झेंडे हातात घेऊन रस्त्यावरुन जात होते. यावेळी कारमधून जाणाऱ्या एका श्वानाला त्यांना मारले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण मंडळी रस्त्यावरुन झेंडे घेऊन गाड्यांवर जाताना दिसत आहे. याच वेळी एका गाडीतून काही लोक चालले आहेत. याच चार चाकी गाडीमध्ये एक कुत्रा बसलेला आहे. कुत्रा खिडकीतून बाहेर आनंदाचे वातावरण बघताना दिसत आहे. यावेळी दुचाकीवरुन जाणारे काही लोक त्या श्वानाला थप्पड मारतात, तर काही लोक त्याला बाटलीने मारतात. या घटनेने कार चालक आणि कुत्र्याचा मालक देखील हैराण आणि नाराज झालेले दिसत आहेत.
Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
Group of Pakistanis who were out on roads celebrating Pak independence day slapped a pet dog inside Car.
Worst than animals 😡pic.twitter.com/RNlBfM1Kmk
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) August 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @FrontalForce या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. प्राणी प्रेमींनी त्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. अशा लोकांना बेदम मारले पाहिजे असे म्हटले आहे. त्यात स्वातंत्र्यदिना दिवशी हि घटना घडल्याने हा व्हिडिओ सध्या जास्त चर्चेचा विषय बनला आहे. प्राण्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार असतो. त्यांच्या स्वातंत्र्यवरही मानवाने बंदी आणू नये असे लोकांनी म्हटले आहे.
या व्हिडिओवर सोशल मीडियावरील युजर्सकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे. त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी असे लोकांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यचा खरा अर्थ मानवता आणि करुणा जपणे होतो असे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.