Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Greenland Protests: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर ताबा घेण्याच्या योजनेविरुद्ध डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत. लोक त्यांच्या लोकशाही हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 17, 2026 | 08:30 PM
trump greenland takeover protests denmark nuuk us embassy encircled january 2026

trump greenland takeover protests denmark nuuk us embassy encircled january 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘हँड्स ऑफ ग्रीनलँड’ आंदोलन
  • दूतावासांना घेराव
  • टॅरिफची धमकी

Hands Off Greenland : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ग्रीनलँड बळकावण्याच्या महत्वाकांक्षेने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर रणकंदन माजवले आहे. शनिवारी डेन्मार्क आणि ग्रीनलँडची राजधानी ‘नुउक’ (Nuuk) मध्ये जनआक्रोशाचा महास्फोट झाला. “आम्ही विक्रीसाठी नाही!” आणि “आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा!” अशा घोषणा देत हजारो नागरिक अमेरिकन दूतावासांच्या दिशेने कूच करत आहेत. ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणाने केवळ आर्क्टिक प्रदेशच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

नुउक ते कोपनहेगन: ‘हँड्स ऑफ ग्रीनलँड’ची गर्जना

‘उगुट’ (Uagut) आणि ‘हँड्स ऑफ ग्रीनलँड’ यांसारख्या स्थानिक संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत आहेत. शनिवारी कोपनहेगनमध्ये कडाक्याच्या थंडीतही निदर्शकांनी रॅली काढून अमेरिकन दूतावासाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे, ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये दुपारी ४ वाजता हजारो लोक ग्रीनलँडिक ध्वज घेऊन अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर जमा झाले. आयोजकांच्या मते, ही लढाई केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर लोकशाही मूल्ये आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Senate: पुरुष अन् गर्भधारणा? डॉ. निशा वर्मांच्या उत्तराने विज्ञान विश्व थक्क; अमेरिकन सिनेटमधील ‘त्या’ वादाचा VIDEO VIRAL

ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ धमकी आणि वाढता तणाव

या आंदोलनांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “जे देश आमच्या ग्रीनलँड योजनेला विरोध करतील, त्यांच्यावर आम्ही प्रचंड आयात शुल्क (Tariffs) लादू,” असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावापासून वाचवण्यासाठी अमेरिकेने ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आवश्यक आहे. मात्र, डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावत आपली सुरक्षा करण्यासाठी नाटो (NATO) समर्थ असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

जनमत काय सांगते? ८५ टक्के लोकांचा विरोध!

जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, ग्रीनलँडमधील ८५ टक्के जनता अमेरिकेत सामील होण्याच्या प्रस्तावाविरुद्ध आहे. केवळ ६ टक्के लोकांनी याला पाठिंबा दिला आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक निल्सन यांनीही स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांची ही योजना बेकायदेशीर असून ग्रीनलँड आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. विशेष म्हणजे, अमेरिकन काँग्रेसच्या (Congress) एका शिष्टमंडळानेही कोपनहेगनमध्ये जाऊन स्पष्ट केले की, ट्रम्प यांचे हे वैयक्तिक विचार आहेत आणि सर्व अमेरिकन जनता याच्या समर्थनार्थ नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protest: ‘सरकार पडणारच’, राजपुत्र रझा पहलवी यांची गर्जना; इराणची ‘आयर्न लेडी’ अटकेत, वीकेंडला पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी

आर्क्टिकमधील ‘शीतयुद्ध २.०’

तज्ज्ञांच्या मते, ग्रीनलँडमध्ये सापडणारी दुर्मिळ खनिजे आणि बर्फ वितळल्यामुळे तयार होणारे नवीन सागरी मार्ग (Northern Sea Routes) यावर ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प हे सर्व दबावतंत्र वापरत आहेत. मात्र, डेन्मार्कने ग्रीनलँडमध्ये आपले लष्करी बळ वाढवण्यास सुरुवात केली असून, युरोपीय देशांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अमेरिका आणि युरोपीय मित्रराष्ट्रांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडमध्ये आंदोलने का होत आहेत?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची योजना आखली असून, त्याला विरोध करण्यासाठी आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

  • Que: ट्रम्प यांनी काय धमकी दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जे देश त्यांच्या ग्रीनलँड योजनेला विरोध करतील, त्यांच्यावर अमेरिका प्रचंड आयात शुल्क (Tariffs) लादेल.

  • Que: ग्रीनलँड डेन्मार्कचा भाग आहे का?

    Ans: होय, ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त (Autonomous) प्रदेश आहे, मात्र त्याचे स्वतःचे सरकार आणि संसद आहे.

Web Title: Trump greenland takeover protests denmark nuuk us embassy encircled january 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Greenland
  • international news
  • Protester

संबंधित बातम्या

Ashley St Clair: डीपफेकचा बळी ठरली मस्कचीच गर्लफ्रेंड! स्वस्तिक आणि अश्लील प्रतिमांमुळे ‘Grok’वर बंदीची मागणी
1

Ashley St Clair: डीपफेकचा बळी ठरली मस्कचीच गर्लफ्रेंड! स्वस्तिक आणि अश्लील प्रतिमांमुळे ‘Grok’वर बंदीची मागणी

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा
2

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा

Cold War 2: रशियाचे 50 लष्करी तळ सज्ज! उत्तर ध्रुवावर वर्चस्व मिळवण्यासाठी मित्र राष्ट्रांमध्येच जुंपली; कोण होणार पुढची महासत्ता?
3

Cold War 2: रशियाचे 50 लष्करी तळ सज्ज! उत्तर ध्रुवावर वर्चस्व मिळवण्यासाठी मित्र राष्ट्रांमध्येच जुंपली; कोण होणार पुढची महासत्ता?

HinduACTion: 10 फेब्रुवारीला अमेरिकेत काय होणार? हिंदूंच्या रक्षणासाठी उत्सव चक्रवर्ती यांनी मांडला ‘ॲक्शन प्लॅन’
4

HinduACTion: 10 फेब्रुवारीला अमेरिकेत काय होणार? हिंदूंच्या रक्षणासाठी उत्सव चक्रवर्ती यांनी मांडला ‘ॲक्शन प्लॅन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.