IranProtests2026: इराणमध्ये निदर्शकांच्या नेत्याला अटक, हिंसक निदर्शनांचा सूत्रधार! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Nazanin Baradaran arrested Iran protests 2026 : गेल्या १९ दिवसांपासून इराणमध्ये (Iran) सुरू असलेला जनआक्रोश आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. आर्थिक संकटातून पेटलेल्या या वणव्याने संपूर्ण इराणला कवेत घेतले होते. मात्र, आता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सरकारसाठी डोकेदुखी ठरलेल्या नाझानिन बारादरन (Nazanin Baradaran) यांना इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) गुप्तचर माहितीच्या आधारे अटक केली आहे. बारादरन या हिंसक निदर्शनांच्या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सरकारने केला असून, या अटकेमुळे आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इराणमधील परिस्थिती किती भीषण आहे, याचा अंदाज मानवाधिकार संघटनांच्या आकडेवारीवरून येतो. ‘HRANA’ या संस्थेच्या माहितीनुसार, आतापर्यंत २,४०३ आंदोलक आणि १४७ सुरक्षा दलाचे जवान या संघर्षात मारले गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे १८,१३७ लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. इराणमध्ये सध्या ‘डिजिटल ब्लॅकआउट’ असून इंटरनेट बंद असल्याने जगापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तरीही बाहेर येणाऱ्या बातम्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात बजावले होते की, “जर इराणने निदर्शकांना फाशी देण्यास सुरुवात केली, तर अमेरिका शांत बसणार नाही आणि अत्यंत कठोर लष्करी कारवाई करेल.” या दबावाचा परिणाम असा झाला की, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी निदर्शकांना फाशी देण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी आज पहाटे एका सोशल मीडिया पोस्टमध्ये इराणच्या या निर्णयाचे स्वागत करत “८०० लोकांची फाशी रद्द केल्याबद्दल मी इराणच्या नेतृत्वाचा आदर करतो,” असे म्हटले आहे.
Iran’s IRGC arrested Nazanin Baradaran, the ringleader of terror groups in the country, following complex intelligence operations. Follow: https://t.co/LWoNSpkc2J pic.twitter.com/rtg49XNwND — Press TV 🔻 (@PressTV) January 17, 2026
credit – social media and Twitter
हे आंदोलन २८ डिसेंबर २०२५ रोजी तेहरानच्या बाजारपेठेतून सुरू झाले होते. इराणच्या चलनात (Rial) झालेली ऐतिहासिक घसरण आणि महागाईमुळे सामान्य जनता रस्त्यावर उतरली. दरम्यान, निर्वासित राजपुत्र रझा पहलवी यांनी या आंदोलनाला अधिक हवा दिली आहे. त्यांनी लोकांना या वीकेंडला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले असून, “इराणी सरकार पडण्याची वेळ जवळ आली आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. शुक्रवारी त्यांनी पुन्हा एकदा जनतेला एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करणारा संदेश पाठवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Defense Deals: ‘आम्ही शस्त्रेही देऊ आणि तंत्रज्ञानही!’ जर्मनीच्या पंतप्रधानांनी भारताला दिली जागतिक बाजारपेठ हादरवणारी महाऑफर
सध्या इराणमधील मुख्य शहरांमध्ये सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निदर्शने काही प्रमाणात शांत झाल्याचे दिसत असले तरी, नाझानिन बारादरन यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा असंतोष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराण सरकारने जरी ‘फाशी देणार नाही’ असे म्हटले असले तरी, अटक केलेल्या १८,००० लोकांचे भवितव्य काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: नाझानिन बारादरन या इराणमधील सरकारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्या आहेत. हिंसक निदर्शनांचा कट रचल्याच्या आरोपावरून आयआरजीसीने त्यांना अटक केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी म्हटले होते की, जर इराणने अटक केलेल्या निदर्शकांना फाशी दिली, तर अमेरिका इराणवर "कठोर लष्करी कारवाई" करेल.
Ans: २८ डिसेंबर २०२५ रोजी इराणमधील कोसळलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि चलनाच्या घसरणीमुळे सामान्य जनतेने सरकारविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले.






