अलास्कातील 'या' लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump and Putin Meet in Alaska : वॉशिंग्टन : उद्या शुक्रवारी (१५ ऑगस्ट) अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची अलास्कामध्ये बैठक होणार आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर शांतता करारासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत युक्रेन युद्धाला कोणते वळण मिळेल यावर निकाला लावला जाणार आहे.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले युद्ध थांबेल का आणखी तीव्र होईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. पंरुत ट्रम्प यांनी अलास्कामध्येच बैठक घेण्याचा निर्णय नेमका का घेतला असाही प्रश्न विचारला जात आहे. मानले जात आहे की, अमेरिकेसाठी आणि रशियासाठी अलास्का अत्यंत महत्वाचे आहे. ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक अलास्कातील एल्मेनडॉर्फ रिचर्डसन या लष्करी तळावर होणार आहे.
स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा
एल्मेनडॉर्फ रिचर्डसन लष्करी तळ
अलास्कातील अँकरेज शहराजवळ अमेरिकेचे लष्करी तळ आहे. येथे हवाई दल, लष्कर, नौदल आणि मरीन कॉर्प्सच्या सैनिकांसह मोठ्या प्रमाणात नॅशनल गार्ड्स आणि रिझर्व्ह दल तैनात करण्यात आले आहे. याला एल्मेनडॉर्फ रिचर्डसन या लष्करी तळ म्हटले जाते. या ठिकाणी ३२ हजाराहून अधिक लष्करी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात.
अमेरिकेसाठी हा तळ महत्वाचा का?
हा तळ अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामागचे कारण म्हणजे शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनविरुद्ध अमेरिकेचे रक्षण करण्यात या तळाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. खरंतरं ट्रम्प यांना रशियाच्या अधिकाऱ्यांना या तळावर बोलवायचे नव्हेत परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांनी एल्मेनडॉर्फ रिचर्डसन या तळावर बैठक घेण्याचे ठरवले.
हा तळ अत्यंत सुरक्षितआहे. शिवाय अमेरिकेने १८६७ च्या काळात रशियाकडून अलास्का खरेदी केल्यानंतर पहिल्यादांच रशिया आणि अमेरिकेची बैठक पार पडत आहे. अलास्का पूर्वी रशियाचा भाग होता. परंतु अमेरिकेने ७२ मिलियन डॉलर्सला हे शहर खरेदी केले. हे शहर रशियापासून केवळ ५५ मैल (८८ किमी) दूर आहे.
रशियासाठी ही बैठक ठरणार गेम चेंजर?
याच वेळी रशियासाठी अलास्कामधीलही बैठक गेम चेंजर ठरु शकते असे मानले जात आहे. या बैठकीला युक्रेनचे अध्यक्ष किंवा अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. यामुळे या बैठकीती कोणतेही निर्णय मान्य होणार नाहीत. शिवाय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून अटक वॉरंट असताना रशियाचे अध्यक्ष पुतिन देशातून बाहेर जात आहेत. यामुळे हा रशियासाठी मोठा विजय मानला जात आहे
पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?