Trump Threatens to impose 155% tax on China
US China Trade War : वॉशिंग्टन/बीजींग : पुन्हा एकदा मोठे ट्रेड वॉर सुरु झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी १५५% कर (Tarrif) लादण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमेरिकेला चीनचा मोठा झटका; ट्रंपच्या टॅरिफमुळे चीनने ‘हा’ करार मोडला, जागतिक बाजारपेठेत खळबळ
ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले आहे की, चीन आणि अमेरिकेमध्ये कोणताही व्यापर करार झालेला आहे, पण चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आता १५५% कर लादण्यात येईल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठा घसरण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आलेले आहे, जेव्हा गेल्या सात वर्षात चीनने अमेरिकेकडून एकही टन सोयाबीन खरेदी केलेला नाही. यामुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये रेअर अर्थ मिनिरल्सवर महत्त्वपूर्ण करार झाला. यादरम्यान त्यांनी म्हटले की, अमेरिका चीनसोबत (China) उत्तम व्यापार करण्याच्या टप्प्यात आहे, यामुळे दोन्ही देशांसाठी मोठा फायदा होईल. तसेच ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचीही भेट घेणार आहे. येत्या आठवड्यात चीनसोबत दक्षिण कोरियामध्ये त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी असाही इशारा दिला की, जर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावर कोणताही तोडगा निघाला नाही, तर त्यांच्यावर १५५% पर्यंत कर लादण्यात येईल.
ट्रम्प यांच्या या विधानानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या टॅरिफमुळे वस्तूंच्या किमती वाढतील, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, खेळणी आणि घरगुती वस्तू या सर्वांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर अद्याप चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण चीनच्या सरकारी माध्यमांनी याला एक राजकीय नाट्य म्हटले आहे. आता सर्वांचे येत्या आठवड्यात होणाऱ्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धावर वाटाघाटी चर्चेकडे लागले आहे.
भारतावर होणार परिणाम
दरम्यान या सर्वांमध्ये भारताची चर्चा सुरु आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लागू केला आहे. तसेच अशा परिस्थिती चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम हा भारतावर होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनची पुरवठा साखळी ही जगभर परसरलेली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक हालचाल व्यापार संतुलनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला काय धमकी दिली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला वाटाघाटी चर्चेत दोन्ही देशांच्या हिताचा कोणताही निष्कर्ष न निघाल्यास १५५% कर लादण्याची धमकी दिली आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी विधानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चर्चा सुरु आहे?
ट्रम्प यांच्या विधानाने आंतरारष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे, जागतिक बाजारपेठांमध्ये काय परिणाम होईल यावर चर्चा सुरु आहे.
प्रश्न ३. ट्रम्प यांच्या विधानावर चीनने काय प्रतिक्रिया दिली आहे?
ट्रम्पच्या विधानावर चीनकडून अद्यापर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु चिनी माध्यमांनी याला राजकीय नाटक म्हणून संबोधले आहे.