फोटो सौजन्य सोशल मीडिया
ते दोन उमेदवार एका खुल्या मंचावर येऊन एकमेकांसोबत जाहीरपणे वादविवाद करतात . तसेच अमेरिकेत एकदा पंचवार्षिक निवडणूक झाली कि पुढील पाच वर्ष किंवा चार वर्ष निवडणूक नसते असे नाही . अर्धी टर्म झाल्यावर पुन्हा मध्यावधी निवडणुका तिथे घेतल्या जातात . त्यामुळे प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला दोनदा निवडणुकीला सामोरे जावे लागते . या सारख्या अनेक बाबींमुळे अमेरिकेत लोकशाही जिवंत राहण्यासाठी कटिबद्ध होत राहत असते .
अमेरीकेत मध्यावधी निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे . डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दोन वर्षात काँग्रेसवर कोणाचे नियंत्रण असेल हे ठरवण्यासाठी लाखो नागरिक आज अमेरिकेत मतदान करत आहेत . ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या आणि जगाच्या राजकारणात उलथापालथ करायला सुरवात केली . त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी बऱ्याचदा अमेरिकेला गोत्यात आणले आहे . अशा टीका त्यांच्यावर झाल्या आहेत . आता त्यांच्या अध्यक्षपदाची शेवटची दोन वर्ष राहिली आहेत .
ते यानंतर कधीही परत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत . अमेरिकेत लोकांना जास्त चिंता महागाईची आहे . ट्रम्प यांनी लादलेले आक्रमक शुल्क आणि इराणसोबतचे युद्ध नागरिकांना आवडले नाही . यामुळे अन्न आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत . यासर्वावर ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात विक्रमी संख्येत ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे .
त्यांनी देशभरात डझनभर सभा घेऊन जोरदार प्रचार मोहीम राबवली आहार . पण वाढत्या किमती ही सर्वच पक्षांच्या मतदारांसाठी चिंतेची बाब आहे .पण ट्रम्प यांच्यासाठी मात्र ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे . ही निवडणूक हरल्यास त्यांच्यावर बरीच बंधने येऊ शकतात तसेच वातावरण आणखी गडद झाल्यास त्यांना खुर्चीवरून पायउतार सुद्धा व्हावे लागेल . अशा चर्चा रंगलेल्या आहेत .
अमेरिकेची संसद काँग्रेस ( US Congress ) म्हणून ओळखली जाते . अमेरिकेची संसदीय व्यवस्था दोन सदनीय असून तिचे दोन प्रमुख भाग आहेत . त्यातल्या पहिल्या भागाला प्रतिनिधीगृह असे म्हणतात . त्यामध्ये सदस्यांची एकूण सदस्य संख्या ४३५ एवढी असते . सदस्यांचा कार्यकाळ फक्त दोन वर्षांचा असतो . यामध्ये प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतात .
या प्रतिनिधीगृहाची महत्वाची भूमिका अर्थसंकल्प आणि आर्थिक विधेयकांमध्ये असते . तर दुसऱ्या भागाला सिनेट ( Senate ) असे म्हणतात . त्याची एकूण सदस्य संख्या १०० असते . प्रत्येक राज्यातून दोन सिनेटर निवडले जातात . प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो . दर दोन वर्षांनी साधारण एक तृतीयांश जागांसाठी निवडणूक होते . राष्ट्राध्यक्षांच्या महत्वाच्या नियुक्त्या आणि आंतराराष्ट्रीय करारांना मान्यता मान्यता देण्याचे अधिकार सिनेटकडे असतात .
एका अर्थाने ट्रम्प यांचे जाणे हे अमेरिकेसाठी जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे हे जगासाठी सुद्धा आहे . कारण आधी निवडून यायच्या आधी ट्रम्प यांनी नो वॉर अगेन आणि ( Maga ) मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा घोषणा दिल्या आणि काम केले उलट . पण हे कोणत्याही राजकीय नेत्याने असे वागणे नवीन नाही पण जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर अमेरिकेची पकड आणि वर्चस्व असल्याने त्याचा परिणाम हा इतर देशांवर होत असतो .
ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध छेडले , व्हेनेझुएला ताब्यात घेतले , ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा प्रकट केली , इराणवर युद्ध पुकारले , युद्धाचे नियम मोडले , जगाच्या व्यापारावर टांगती तलवार ठेवली , त्यांच्या निर्णयामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला कारण नसताना जीव गमवावा लागला . आत्ममग्न आणि स्वकेंद्रित स्वभावामुळे त्यांनी जगाला त्रासच दिला ..त्यांच्या एकाही निर्णयाने जगात आनंदाची भर पडली नाही . अमेरिकेत त्यांचे चाहते मात्र खुश असतील किंवा काही निर्णय अमेरिकेच्या भल्यासाठी असतील पण जगाच्या पदरात ट्रम्प यांनी निराशाच टाकली आहे . अर्थात हे अमेरिकेचे गुणधर्मच आहेत .






