Turkey propagating Islam in Nepal
Nepal News In Marathi : काठमांडू : एक मोठी माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये तुर्कीकडून इस्लामिक धर्माचा प्रचार होत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच भारतालाही चिंतेत टाकले आहे. नेपाळमध्ये घडलेल्या काही घटनांवरुन अंदाज लावला जात आहे की, तुर्कीच्या संघटनांकडून नेपाळमध्ये इस्लाम धर्माचा प्रसार होत आहे. यामुळे ही बाब नेपाळमधील ८२ भारतीय लोकसंख्येसाठी धोकादायक ठरु शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
नेपाळच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितपूर जिल्ह्यात संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहे. परदेशात प्रवास करणारे लोक मोठ मोठी धार्मिक पुस्तके घेऊन येताना दिसत आहे. यामुळे नेपाळच्या इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ललतिपूर येथील एका धोबी घाट वसतिगृहात छापा टाकला. यावेळी हिमालय शिक्षम आणि हितौषी समाज नावाच्या संघटनेने मुलांना कुराण शिकवत असल्याचे दिसून आले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की मुलांना नेपाळी अभ्यासक्रमाऐवजी धार्मिक शिक्षण येथे दिले जात होते.
अमेरिकेच्या निवडणुकीत पेटला धार्मिक वाद? प्रचारासाठी ट्रम्प समर्थकाने जाळले थेट कुराण, VIDEO
अधिकाऱ्यांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, येथे शिकणारी मुले ही बहुतेक करुन गरीब घरातील किंवा अनाथ होती. यामुलांच्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांना इस्लाम धर्माबद्दल शिकवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण देणाऱ्यांकडे वर्क परमिटही नव्हते. तरीही ते लोक नेपाळमध्ये थांबले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोकांमध्ये काही लोक इंडोनेशियातून आलेले होते.
नेपाळचे आव्रजन महानिदेशक रामचंद्र तिवारी यांनी यावर माहिती देताना सांगितले की, परदेशातून येणारे व्यक्ती व्हिसा अटीनुसार, कार्य करतात की नाही हे पाहणे आमची जबाबदारी आहे. यामुळेच संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच तातडीने छापा टाकण्यात आला. सुरुवातीच्या तापास अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. यामुळे सध्या याची खोल चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या घटनेने नेपाळ सरकारलाही धक्का बसला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान अलीकच्या काळात जगभरात तुर्कीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण आशियाऊ देशातही त्यांना प्रयत्न सुरु केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नेपाळमध्ये मोठा गोंधळ उडाला असून ही बाब नेपाळच्या सामाजिक आणि धार्मिक संतुलनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर