
Trump raises tariffs on Canadian goods in response to anti-tariff TV AD
US Canada Relations : वॉशिंग्टन/ओटावा : अमेरिका आणि कॅनडामध्ये (Canada) पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कॅनडावर १० टक्के अतिरिक्त कर लागू केला आहे. एका जाहिरातीमुळे हा वाद उसळला आहे.
Halloween Horror : अमेरिकेत हॅलोवीन पार्टी रक्तरंजित ; नॉर्थ कॅरोलिनातील गोळीबारात २ ठार
ट्रम्प यांनी शनिवारी (२५ ऑक्टोबर) एअर फोर्स विमानातून मलेशियाला रवाना होताना कॅनडाला इशारा दिला होता. त्यांनी ओंटारियो प्रांताने जारी केलेली शुल्कविरोधी जाहिरत तात्काळ हटवण्यास सांगितले होते, असे न केल्यास त्यांनी कॅनडाला १० % अतिरिक्त करलागू करण्याची धमकी दिली होती.
ट्रम्प यांनी कॅनडाची जाहिरात अमेरिकेच्या शुल्क धोरणांवर टिका करणारी असल्याचे म्हटले. या जाहिरातीमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या विधानांचा वापर करण्यात आला होता. यामुळे ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत, जाहिरातील खोटे आणि शत्रुतापूर्ण म्हटले. तसेच यामुळे त्यांनी कॅनडासोबत व्यापार चर्चा बंद करण्याचीही धमकी दिली होती.
शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) वर्ल्ड सिरीच्या पहिल्या सामान्यात जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच कॅनडाने यावर प्रतिक्राय देत आठवड्याच्या शेवटानंतर जाहिरात काढून टाकण्याचे म्हटले होते. पण ट्रम्प यांनी, जाहिरात प्रसारित
करण्याची परवानगी न देण्याचे म्हटले. त्यांनी जाहिरातीत चुकीची माहिती देण्यात आले असल्याचे म्हणत, कॅनडावर १० अतिरिक्त शुल्क लागू केला.
सध्या कॅनडावरच्या अर्थव्यवस्थेवर ट्रम्प यांच्या शुल्कामुळे मोठा परिणाम झाला आहे. पंतप्रधान मार्क कार्नी अमेरिकेशी शुल्कात कपात करण्यासाठी वाटाघाटी चर्चा करत आहेत. कॅनडाचा सुमारे ७५ टक्के माल अमेरिकेला पाठवला जातो.
३.६ अब्जाहून अधिक माल आणि सेवा सीमा ओलांडतात. सध्या अमेरिकेने कॅनडाच्या काही वस्तूंवर ३५ टक्के टॅरिफ (Tarrif) लागू केले आहे. पोलाद आणि अल्युमिनियमवर ५०% कर लादला आहे. तर उर्जा उत्पादनांवर १० टक्के कर लादण्यात आला आहे. यामुळे कॅनडाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या अतरिक्त करामुळे अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रश्न १. कॅनडावर का संतापले ट्रम्प?
कॅनडाच्या ओंटारियो प्रांताने शुल्कविरोधी जाहिरात प्रसारित केली आहे, ज्यामुळे हा वाद उसळला आहे. ट्रम्प यांनी जाहिरातीतील तथ्ये खोटे असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
प्रश्न २. कॅनडावर ट्रम्प यांनी किती टक्के कर लादला आहे?
अमेरिकेने कॅनडाच्या काही वस्तूंवर ३५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. पोलाद आणि अल्युमिनियमवर ५०% कर लादला आहे. तर उर्जा उत्पादनांवर १० टक्के कर लादण्यात आला आहे. आणि आता अतरिक्त १०% कर लागू करण्यात आला आहे.