
Turkish Airlines plane tyre catches fire at Kathmandu Airport News Marathi
Delhi Airport fire News : उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग; २३२ प्रवाशांचा थरारक बचाव
काठमांडू आंतरराष्ट्रीय विमातळाच्या सुरक्षा पोलिस अधीक्षक यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तुर्की (Turkey) एअरलाईन्सच विमान, फ्लाइट क्रमांक TK 726 इस्तंबूलहून नेपाळची राजधानी काठमांडूला आले होते.
परंतु लँडिगवेळी विमानाच्या टायरमधून धूर निघू लागला आणि अचानक पेटला. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. आगीवर नियंत्रण मिळवले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या विमानात २८९ प्रवासी आणि ११ क्रू मेंबर्स होते.
Nepal | A Turkish Airlines aircraft’s tyre catches fire while landing at Tribhuvan International Airport in Kathmandu. The fire has been doused and all passengers have been evacuated, confirmed the police. “The Turkish Airlines TK 726 was en route to Kathmandu from Istanbul and… — ANI (@ANI) May 11, 2026
घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अधिकारी आणि अग्निशमन दलाने बचाव कार्यासाठी धाव घेतली. आगीवर वेळेत नियंत्रत मिळवत विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारीही उपस्थित होत. सर्व अधिकारी सुरक्षित आहेत.
या घटनेने विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणलाही गंभीर इजा झालेली नाही. परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणण्यात आली.
#BREAKING A Turkish Airlines plane caught fire while landing at Kathmandu airport after arriving from Istanbul. Passengers were safely evacuated through emergency exits as firefighters quickly doused the blaze. All passengers are safe, officials pic.twitter.com/38vm5Lkr3X — The South Asia Times (@thesouthasiatim) May 11, 2026
मोठी बातमी! अनर्थ टळला; मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन् बाह्य चाक…
Ans: नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमातळावर एक दुर्घटना घडली. एका तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला लँडिगवेळी टायरमध्ये अचानक आग लागली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडू विमानतळ अधिकारी आणि अग्निशमन दलाना तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले होते. यामुळे विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
Ans: तुर्की एअरलाइन्सच्या विमानात ११ क्रू मेंबर्स आणि २८९ प्रवासी होते.