
uae president visit to pakistan
यूएईचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानमध्ये पोहोचले असून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले आहे. असीम मुनीरच्या आमंत्रणावरुनच यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे पाकिस्तानला रणतीनीक महत्त्व मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि यूएईमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरदेखील चर्चा होईल. यामध्ये राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात पाकिस्तान आणि यूएईमध्ये उर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा होणार आहे. तसेच सौदी अरेबियासारखा संरक्षण करार देखील पाकिस्तान-UAE मध्ये केला जाऊ शकतो. सध्या यूएईकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाहीत, परंतु अरब देशांकडून पाकिस्तानला मिळणारा पाठिंबा हा भारतासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करार करण्यात आला होता. हा करार दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी घेण्यातत आला होता. या करारानुसार, एका देशावर हल्ला हा दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल असे निश्चित करण्यात आले होते. याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये एक संरक्षण गट देखील तयार केला जाणार आहे.
सौदी अरेबियानंतर आता यूएईचा पाठिंबा पाकिस्तानला मिळत आहे. यावरुन अरब देश पाकिस्तानच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट चित्रित होत आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत संवदेनशील आणि चिंताजनक आहे. शिवाय आधीच पाकिस्तानला चीनची लष्करी आणि आर्थिक मजबूत मिळते. अशा वेळी अरब देशांचा पाठिंबा पाकिस्तानची लष्करी स्थिती अधिक बळकट करणार आहे. याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर आणि सीमावर्तीत भागांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारत आणि यूएईचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध मजबूत आहे. पण पाकिस्तानसोबतची यूएईची वाढती जवळीक या संबंधावर परिणाम करु शकते.
Ans: UAE च्या राष्ट्राध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे भारतासाठी सुरक्षा आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे या वाढत्या जवळीकतेमुळे भारत चिंतेत आहे.
Ans: यूएई आणि पाकिस्तान मोठा संरक्षण करार होण्याची शक्यता आहे.
Ans: यूएई आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर, ज्यामध्ये उर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि प्रादेशिक सुरक्षेचा समावेश आहे.
Ans: यूएई आणि पाकिस्तान संबंधामुळे भारत-पाकिस्तानच्या सीमावर्ती तणावात आणि भारताच्या सुरक्षा आव्हानंमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे भारत आणि यूएईच्या संबंधावर देखील थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.