Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Turkey Uganda: ‘एक अब्ज डॉलर्स आणि लग्नासाठी सर्वात सुंदर स्त्री’, युगांडाच्या लष्करप्रमुखांची तुर्कस्तानकडे ‘ही’ विचित्र मागणी

Uganda: युगांडाच्या राष्ट्रपतींचे पुत्र आणि संरक्षण दलाचे प्रमुख मुहूझी कैनेरुगाबा यांनी तुर्कीकडे केलेल्या विचित्र मागण्यांनी सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी तुर्कीवर अनेक प्रकल्पांमधून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 03:15 PM
uganda army chief muhoozi kainerugaba demands 1 billion dollars beautiful woman from turkey 2026

uganda army chief muhoozi kainerugaba demands 1 billion dollars beautiful woman from turkey 2026

Follow Us
Follow Us:
  • विचित्र मागणी
  • राजनैतिक इशारा
  • नफ्याचा आरोप

Muhoozi Kainerugaba Turkey threat : जागतिक राजकारणात अनेकदा गंभीर चर्चा ऐकायला मिळतात, पण सध्या युगांडाच्या (Yuganda) लष्करप्रमुखांनी केलेल्या एका मागणीने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र आणि देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (UPDF) जनरल मुहूझी कैनेरुगाबा यांनी तुर्किये (Turkey) सरकारसमोर अत्यंत विचित्र आणि खळबळजनक मागण्या ठेवल्या आहेत. केवळ पैसेच नाही, तर लग्नासाठी देशातील सर्वात सुंदर स्त्रीची मागणी करून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन वाद निर्माण केला आहे.

नेमकी काय आहे मागणी? आणि का?

मुहूझी कैनेरुगाबा यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वरून तुर्कियेवर अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या मते, युगांडा गेल्या दोन दशकांपासून सोमालियामध्ये ‘अल-शबाब’ सारख्या दहशतवादी गटांशी लढून प्रादेशिक सुरक्षा पुरवत आहे. मात्र, या सुरक्षेचा फायदा घेऊन तुर्किये सोमालियातील मोगादिशू बंदर आणि विमानतळाच्या प्रकल्पांमधून प्रचंड नफा कमावत आहे. “तुर्किये जर नफा कमावत असेल, तर युगांडाला सुरक्षेचा लाभांश म्हणून १ अब्ज डॉलर्स मिळालेच पाहिजेत,” असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, सर्वांना धक्का बसला तो त्यांच्या दुसऱ्या मागणीने, ज्यात त्यांनी तुर्कियेतील सर्वात सुंदर स्त्रीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India UAE Ties : ‘भारत हा एक खरा आणि शूर मित्र, इस्लामी जिहादी दहशतवाद्यांना…’; पाकिस्तानवर UAEचा मोठा आरोप

३० दिवसांचा ‘अल्टिमेटम’ अन् दूतावास बंद करण्याची धमकी

कॅनेरुगाबा इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तुर्किये सरकारला ३० दिवसांची मुदत दिली आहे. जर या काळात १ अब्ज डॉलर्स दिले नाहीत, तर युगांडाची राजधानी कम्पाला येथील तुर्कियेचा दूतावास बंद केला जाईल आणि सर्व राजनैतिक संबंध संपुष्टात आणले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. “हा आमच्यासाठी एक सोपा करार आहे. एकतर पैसे द्या किंवा तुमचे दुकान गुंडाळा,” अशा जहाल भाषेत त्यांनी तुर्कियेला सुनावले आहे. त्यांनी युगांडाच्या नागरिकांनाही तुर्कियेला प्रवास न करण्याचा सल्ला दिला असून, तुर्किये पाठीत खंजीर खुपसणारा मित्र असल्याचे म्हटले आहे.

Chief of Uganda Defence Forces Muhoozi Kainerugaba: “On top of the $1 billion from Turkey, I want the most beautiful woman in that country for a wife!” pic.twitter.com/0D3Ohv26RS — Ounka (@OunkaOnX) April 11, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलला पाठिंबा आणि लष्करी हालचाली

या संपूर्ण वादात कैनेरुगाबा यांनी इस्रायलचे समर्थन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. “प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र भूमीचे रक्षण करण्यासाठी मी इस्रायलमध्ये १० लाख युगांडाचे सैनिक तैनात करण्यास तयार आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. या विधानामुळे ते केवळ तुर्कियेच्याच विरोधात नाहीत, तर जागतिक समीकरणांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. लष्करप्रमुखांच्या या भूमिकेमुळे युगांडाचे परराष्ट्र मंत्रालय सध्या अडचणीत आले असून, अधिकृत पातळीवर यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  War Crimes : इस्रायलने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! चिमुकल्यांच्या रुग्णालयाची राखरांगोळी; इराणने जारी केला भयावह VIDEO

कॅनेरुगाबा यांचा वादग्रस्त इतिहास

मुहूझी कैनेरुगाबा हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी केनियावर हल्ला करण्याची आणि इटलीच्या पंतप्रधानांना लग्नाची मागणी घालण्याची विधाने करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, यावेळी थेट १ अब्ज डॉलर्स आणि राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिल्याने प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. तुर्किये यावर काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. युगांडाचे हे ‘सोशल मीडिया युद्ध’ खऱ्या संघर्षात रूपांतरित होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युगांडाच्या लष्करप्रमुखांनी तुर्कियेकडे कोणती विचित्र मागणी केली?

    Ans: जनरल मुहूझी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे १ अब्ज डॉलर्स आणि लग्नासाठी देशातील सर्वात सुंदर स्त्रीची मागणी केली आहे.

  • Que: लष्करप्रमुखांनी तुर्कियेवर कोणता आरोप केला आहे?

    Ans: सोमालियातील बंदर आणि विमानतळ प्रकल्पांतून तुर्किये नफा कमावत आहे, पण तिथे सुरक्षा पुरवणाऱ्या युगांडाला कोणताही वाटा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

  • Que: मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांनी कोणता इशारा दिला आहे?

    Ans: ३० दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तुर्कियेसोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याची आणि दूतावास बंद करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

Web Title: Uganda army chief muhoozi kainerugaba demands 1 billion dollars beautiful woman from turkey 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Turkey News
  • World news
  • Yuganda

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.